दाक्षिणात्य तसेच बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम करत अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे राहुल देव. त्याची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळते. राहुल देवच्या खासगी आयुष्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? आज २७ सप्टेंबर रोजी राहुल देवचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी...
राहुल देवने १९९८ साली रिना देवशी लग्न केले होते. मात्र, काही दिवसांमध्ये रिनाला कॅन्सर झाला. अखेर २००९ साली तिचे कॅन्सरने निधन झाले. त्यांना एक मुलगा आहे. पत्नीच्या निधनानंतर राहुल देव एकटा मुलाचा सांभाळ करत होता. याविषयी राहुलने एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले. त्याने मुलाला एकट्याने सांभाळणे किती कठीण होते हे सांगितले.
वाचा: परदेशात आलोक राजवाडेवर आली प्राजक्ता माळीकडून पैसे घेण्याची वेळ, काय आहे प्रकरण?
“मुलांचा सांभाळ करणे सोपे काम नाही. मुलांचे संगोपन करण्यामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा असतो. एक आई ज्याप्रकारे आपल्या मुलाची समजूत काढते त्यासारखे दुसरे कोणीच करू शकत नाही. स्त्रिया आपल्या मुलांबरोबर फार समजूतीने वागतात. मीदेखील तसेच वागण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याचदा माझ्याकडून ते शक्य होत नाही. आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत” असे राहुल म्हणाला.
पुढे तो म्हणाला, “माझ्याबरोबर माझी पत्नी नाही याचा मला खूप त्रास होतो. म्हणूनच याबाबत बोलणे आणि आठवणींमध्ये रमणे मी बऱ्याचदा टाळतो. एका व्यक्तीबरोबर त्याचा जोडीदार नाही हे चित्र बऱ्याचदा चित्रपटामध्ये दाखवण्यात येते. पण नव्याने आयुष्याची सुरुवात करणे फार कठीण असते.”
राहुलने पत्नी रिनाच्या निधनानंतर मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करण्यास सुरुवात केली. एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्या मैत्रिचे रुपांतर नात्यात झाले. त्यांचे नाते जगजाहिर आहे. राहुलने त्याचे हे नाते मुलापासूनही लपवले नाही.