दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अनेक महिलांचे अधिराज्य असल्याचे पाहायला मिळते. त्यामधील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून अभिनेत्री नयानतारा ओळखली जाते. तिने अभिनय आणि स्पष्ट वक्तव्यच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आज १८ नोव्हेंबर रोजी नयनताराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
नयनतारा आज तिचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म १८ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला. नयनताराने दिग्दर्शक विग्नेशशी लग्न केले आहे. त्यानंतर गेल्या वर्षी ती दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. गेल्यावर्षी जरी नयनताराने विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली असली, तरी या आधी तिचे नाव अनेकांसोबत जोडले गेले होते.
नयनतारा हे मनोरंजन विश्वातलं मोठ नाव आहे. साऊथ इंडस्ट्री गाजवणारी नयनतारा सर्वाधिक मानधन आकारणारी अभिनेत्री आहे. अभिनेत्री नयनतारा तिच्या व्यासायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. नयनताराचा जन्म बंगळुरूमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. तिचे वडील हवाई दलात अधिकारी होते. त्यामुळे तिचं बालपण देशातील अनेक भागांमध्ये गेलं.
शालेय शिक्षण देखील तिने देशांच्या अनेक शहरांमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना तिने मॉडेलिंग क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. या काळात तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात देखील केली. प्रसिद्ध साऊथ दिग्दर्शक सथ्यान अंतिकड यांनी तिला 'मानासिनाकेरे' या चित्रपटामधून मनोरंजन विश्वात ब्रेक दिला. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिला सतत चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या.
वाचा: नागा चैतन्य शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पाहुण्यांना काय भेट दिली पाहा
नयनताराचा जन्म एका मल्याळी ख्रिश्चन कुटुंबात झाला असला, तरी तिने हिंदू धर्मात प्रवेश घेतला आहे. चेन्नईमधील आर्य समाज मंदिरात अभिनेत्री नयनताराने हिंदू धर्मात धर्मांतरण केले होते. या दरम्यान अभिनेत्री एका हिंदू दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली होती. त्याच्याशी लग्नगाठ बांधण्यासाठी तिने हिंदू धर्मात प्रवेश घेतल्याचे बोलले जाते. मात्र, काही काळाने तिचे ब्रेकअप झाले. स्वतः नयनताराने याची कबुली दिली होती. यानंतर नयनतारा आणि प्रभूदेवा यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक वर्षांनी या नात्यातदेखील वितुष्ट आले. आता अखेर नयनताराने निर्माता-दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांना दोन जुळीमुले आहेत.
संबंधित बातम्या