मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tanishaa Mukerji Birthday: 'मुलं होणं गरजेचे नाही', तनिषा मुखर्जीने केले होते मोठे वक्तव्य

Tanishaa Mukerji Birthday: 'मुलं होणं गरजेचे नाही', तनिषा मुखर्जीने केले होते मोठे वक्तव्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 01, 2024 11:58 AM IST

Tanishaa Mukerji Personal Life: अभिनेत्री तनिषा मुखर्जी आई होऊ शकत नाही हे तिला जेव्हा कळाले तेव्हा तिने मोठा निर्णय घेतला. हा निर्णय काय होता जाणून घेऊया...

Bollywood actress Tanishaa Mukerji (Photo by Sujit JAISWAL / AFP)
Bollywood actress Tanishaa Mukerji (Photo by Sujit JAISWAL / AFP) (AFP)

एकेकाळची सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा मुखर्जीची मुलगी आणि सुपरस्टार काजोलची बहिण तनिषा मुखर्जी चर्चेत असायची. तिचे चित्रपट हवे तसे बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकले नाहीत. मात्र तनिषा नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरली. आज १ जानेवारी तनिषाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

तनिषाचा जन्म १ जानेवारी १९७८मध्ये मुंबईत झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाचा वारसा मिळाला. पण तनिषाला मात्र तो पुढे चालवता आला नाही. तनिषाने अद्याप लग्न केलेले नाही. पण ती कायमच खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. एका मुलाखतीमध्ये तिने मोठा खुलासा केला होता. ‘वयाच्या ३३ व्या वर्षी माझे एग्ज फ्रीज करायचे होते. जेव्हा मी माझ्या डॉक्टरांकडे गेली, त्यावेळी त्यांनी मला असे न करण्याचा सल्ला दिला. जेव्हा मी आई होऊ शकत नाही याची कल्पना त्यांना आली तेव्हा डॉक्टरांनी मला एग्ज फ्रीज करण्याचा सल्ला दिला. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि मूल असणे गरजेच नाही’ असे ती म्हणाली. तिच्या या वक्तव्याने सर्वजण चकीत झाले होते.
वाचा: उद्यापासून हा मंच सजणार नाही; केबीसीला निरोप देताना बीग बींना अश्रू अनावर

तनिषा पुढे म्हणाली, ‘मूल होण हेच उद्दीष्ट स्त्रीच्या जीवनाचे नाही. एखाद्या महिलेला मूल नसेल तर काही हरकत नाही. लग्न करणे किंवा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असणे आवश्यक नाही.’

तनिषा मुखर्जी ही केवळ एक स्टार किड नव्हे तर तिच्या कुटुंबातून अनेक जणांनी बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलंय. तिची आई तनुजा मुखर्जी यांच्यासोबतच बहिण काजोल आणि चुलत बहिण राणी मुखर्जी या गाजलेल्या अभिनेत्री आहेत. तिच्या बहिणीचा पती अजय देवगण हा सुद्धा एक सुपरस्टार आहे. पण तनिषाचं करिअर मात्र फ्लॉप ठरलं. ‘शश्श्शश्श..’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या तनिषा मुखर्जीला पुढे जाऊन काही चित्रपट मिळाले. पण तरी सुद्धा तिला यात यश मिळाले नाही.

WhatsApp channel

विभाग