बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. तिने आजवर अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज १८ जुलै रोजी प्रियांकाचा ४२ वा वाढदिवस आहे. ती पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत वाढदिवस साजरा करणार असल्याचे समोर आले आहे. प्रियांकाच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्याविषयी कधी न ऐकलेल्या गोष्टी...
प्रियांका चोप्राने सनी देओलच्या 'द हीरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातून प्रियांकाला बॉलिवूड इंडस्ट्रीत नवी ओळख मिळाली होती. मात्र, प्रोफेशनल लाईफपेक्षा प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहिली होती. हॉलिवूड स्टार निक जोनाससोबत लग्न करण्यापूर्वी प्रियांका चोप्राचे नाव इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले होते.
प्रियांका चोप्राने तिच्या मॉडेलिंगच्या काळात बॉलिवूड अभिनेता असीम मर्चंटला डेट केले होते. यानंतर प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळताच तिने असीमसोबत ब्रेकअप केले होते.
‘व्हॉट्स युअर राशी’ फेम अभिनेता हरमन बावेजा आणि प्रियांका चोप्राही जवळपास ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. हरमनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना प्रियांका चोप्राचे सलग तीन चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर मात्र दोघांनी ब्रेकअप केला.
अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे एकत्र काम करताना एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र, या दोघांनी ही गोष्ट कधीच जाहीरपणे मान्य केली नाही.
शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा देखील एकेकाळी बी-टाऊनमध्ये चर्चेचा भाग बनले होते. दोघे एकमेकांच्या जवळ आल्याच्या चर्चेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, या अफवांनंतर शाहरुख आणि प्रियांकाने एकही चित्रपट एकत्र केला नाही.
प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर यांच्या लिंकअपच्या बातम्याही एकेकाळी चर्चेत होत्या. दोघेही काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, असेही म्हटले जाते. पण, हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले.
प्रियांका चोप्राने स्कॉटिश अभिनेता जेरार्ड बटलर याला तिच्या मुंबईत घरी बोलावले होते. यानंतर दोघेही एकत्र असल्याचा अंदाज लोक बांधू लागले.
एमी अवॉर्ड्स दरम्यान प्रियांका चोप्रा आणि टॉम हिडलस्टन एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल दिसले. या दरम्यान दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवाही पसरू लागल्या. पण, लवकरच या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला.
वाचा: 'तौबा तौबा'ची हूक स्टेप कतरिनाला आवडल्यानं विकीला आभाळ ठेंगणं; म्हणाला, ऑस्कर मिळाल्यासारखं वाटलं!
प्रियांका चोप्राला अखेर निक जोनासमध्ये प्रेम खरे मिळाले आहे. या दोन्ही कलाकारांनी २०१८ मध्ये एकमेकांशी लग्न केले. या लग्नापूर्वी दोघांनी काही काळ एकमेकांना डेटही केले होते.
संबंधित बातम्या