मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणारा अतिशय फिट आणि फाईन अभिनेता म्हणून मिलिंद सोमण ओळखला जातो. आज ४ नोव्हेंबर रोजी मिलिंदचा ५९वा वाढदिवस आहे. त्याचा फिटनेस पाहून आजही अनेक मूली फिदा होताना दिसतात. अभिनेत्याचे वय ५९ असले तरी त्याचा फिटनेस पाहून याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मिलिंद नेहमीच आपल्या सोशल मीडियावर लोकांना प्रेरणा देत असतो. अशावेळी मिलिंद स्वत:ला कसा फिट ठेवतो हे जाणून घ्या.
वयाच्या ३८व्या वर्षी मिलिंद आहे फिट
आजकाल तरुण मुल फिट राहण्यासाठी जीम जॉइन करतात. मात्र, मिलिंद सोमण रोज जिममध्ये जात नाही आणि रनिंगही करत नाही. जिम फक्त शरीरसौष्ठवासाठी आहे, फिटनेससाठी नाही, असं मानल्यामुळे त्याने वयाच्या ३८ व्या वर्षी जिममध्ये जाणं सोडलं. मिलिंद अतिशय स्लिम आणि फिट आहे. यामागे मिलिंदने अनेकदा आपण सर्व काही खातो असे म्हटले आहे. तो आपल्या आहारात भरपूर फळांचा समावेश करतो. मिलिंदने एका मुलाखतीत सांगितले आहे की, तो अर्ध्या तासात ३ ते ४ किलो फळे खाऊ शकतो.
काय आहे मिलिंदचा फिटनेस फंडा
मिलिंद सोमण स्वत:ला पूर्णपणे सक्रिय ठेवतात. यामुळे तो आठवड्यातून फक्त तीन ते चार वेळा धावतो. याशिवाय त्याचा फिटनेस मंत्र असा आहे की, तो दररोज २० मिनिटे नक्कीच व्यायाम करतो. रोज धावता येत नसेल तर हरकत नाही, पण व्यायाम करा, जेणेकरून शरीरातील नैसर्गिक हालचाल टिकून राहील, असे तो म्हणाला होता. मिलिंद सकाळची सुरुवात अर्धा लिटर पाणी पिऊन करतो. हे पाणी खोलीच्या तापमानावरच असते. यासह मिलिंद नाश्त्यात शेंगदाणे, पपई, हंगामी फळे खातो. स्नॅकच्या वेळी तो एक कप ब्लॅक टी पितो ज्यात तो गूळ घालतो.
वाचा: 'दृष्ट लागण्या जोगे सारे' गाण्यातील अभिनेत्रीला खरोखरच लागली दृष्ट? अगदी कमी वयात घेतला जगाचा निरोप
मिलिंदच्या खासगी आयुष्याविषयी
मिलिंदचे वडील वैज्ञानिक होते, तर आई बायोकेमिस्ट आहे. मिलिंदच नव्हे तर, त्याची आई वयाच्या ८०व्या वर्षी देखील आपल्या फिटनेसने सगळ्यांना आश्चर्यचकित करत असते. मिलिंद सोमण याने मॉडेलिंग क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि तो या क्षेत्रात सक्रिय झाला. १९९२मध्ये रिलीज झालेल्या ‘जो जीता वही सिकंदर’मधील दीपक तिजोरीच्या पात्रासाठी मिलिंद सोमणची निवड करण्यात आली होती. मात्र, काही कारणांमुळे हा चित्रपट त्याच्या हातून निसटला आणि त्याची बॉलिवूड पदार्पणाची संधी हुकली. नंतर मिलिंद सोमण याने १९९५मध्ये आलिशा चिनॉयचा म्युझिक व्हिडीओ ‘मेड इन इंडिया’मधून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या गाण्यातील त्याच्या लूक्समुळे अवघी तरुणाई त्याच्यावर फिदा झाली होती. त्याच वर्षी ‘अ माउथफुल ऑफ स्काय’ या टेलिव्हिजन मालिकेद्वारे त्याने अभिनयात पदार्पण केले.