मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सचिन खेडेकरांची पहिली हिंदी मालिका माहिती आहे का? वाढदिवशी जाणून घ्या त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास

सचिन खेडेकरांची पहिली हिंदी मालिका माहिती आहे का? वाढदिवशी जाणून घ्या त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास

Aarti Vilas Borade HT Marathi
May 14, 2024 07:45 AM IST

आज सचिन खेडेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या सिनेसृष्टीमधील प्रवासाविषयी. त्यांची पहिली मालिका, पहिले नाटक, चित्रपट यांविषयी जाणून घेऊया…

सचिन खेडेकरांचा सिनेसृष्टीतील प्रवास
सचिन खेडेकरांचा सिनेसृष्टीतील प्रवास

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सचिन खेडेकर ओळखले जातात. त्यांनी अभिनयाच्या जोरावर केवळ मराठीच नाही तर हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, गुजराती आणि इतर भाषांमधील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. २००५ साली प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगल यांच्या 'नेताजी सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो' या चित्रपटात महान स्वातंत्र्यसैनिक सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'हलहल' या चित्रपटात असहाय्य बापाच्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून दिला. आज सचिन खेडेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

सचिन खेडेकरांचा जन्म मुंबईतच झाला

अभिनेते सचिन खेडेकर यांचा जन्म १४ मे १९६५ साली महाराष्ट्रातच झाला. त्यांचे पालनपोषण मुंबईतील विलेपार्ले येथे झाले. त्यांनी रंगभूमीवरील नाटकात काम करत करिअरला सुरुवात केली. १९८५ पासून ते नाटकात काम करत आहेत. 'विधीखेत' हे त्यांचे पहिले नाटक आहे. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. २००० साली त्यांचे 'श्याम रंग' हे नाटक चर्चेत होते.
वाचा: 'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

सचिन खेडेकर यांच्या मालिका

रंगभूमीवर काम करत असताना सचिन खेडेकर यांना काही मालिकांच्या ऑफर्स आल्या होत्या. त्यांनी १९९५ साली प्रदर्शित झालेल्या 'इम्तिहान' या मालिकेत काम करत छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 'सैलाब', 'अभिमान', 'संविधान' या मालिकांमध्ये काम केले. या मालिकांनी त्यांना ओळख मिळवून दिली.
वाचा: विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

बॉलिवूड सिनेमांमध्ये केले काम

सचिन खेडेकर यांनी १९९७ साली 'जिद्दी' या चित्रपटात काम केले. त्यानंतर १९९९ साली 'बादशाह'मध्ये त्यांमी त्यागराज बच्चनची भूमिका साकारली. त्याचवर्षी प्रदर्शित झालेल्या 'अर्जुन पंडित' या चित्रपटात देखील त्यांनी चांगली भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये काम करत असताना सचिन खेडेकर मराठी चित्रपटांमध्येही दिसू लागले. त्यांचा 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. त्यानंतर मी होणार करोडपती या कार्यक्रमात ते सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसले.
वाचा: क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

IPL_Entry_Point