मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mansoor Ali Khan Pataudi: प्रेमासाठी कायपण! शर्मिला टागोर यांना मंसूर अली खान यांनी दिला होता रेफ्रिजरेटर

Mansoor Ali Khan Pataudi: प्रेमासाठी कायपण! शर्मिला टागोर यांना मंसूर अली खान यांनी दिला होता रेफ्रिजरेटर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 05, 2024 08:10 AM IST

Mansoor Ali Khan Pataudi Birthday: आज ५ जानेवारी रोजी मंसूर अली खान पतौडी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी...

Mansoor Ali Khan Pataudi
Mansoor Ali Khan Pataudi

मनमोहक सौंदर्य आणि अदाकारीमुळे एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. आरस्पानी सौंदर्या व अभिनयाच्या जोरावर शर्मिला टागोर यांनी ६०-७० चा काळ चांगलाच गाजवला. त्यामुळे आजही त्यांचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते. १९६८ साली शर्मिला यांनी दिवंगत भारतीय क्रिकेटर मंसूर अली खान पतौडी यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. आज मंसूर अली खान यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या लव्हस्टोरी...

हरियाणा प्रांतातील गुडगावपासून २६ कि.मी. अंतरावर असलेल्या पतौडी या गावी पतौडी याच नावाच्या छोटय़ाशा केवळ १३६ चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या संस्थानाची राजधानी होती. कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या या दुर्लक्षित संस्थानाचा बोलबाला होण्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्याच्या नवाबपदी असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या प्रसिद्ध बेगमा! पतौडी नवाबाच्या घराण्याचे पूर्वज मूळचे अफगाणिस्तानातील बरेच या जमातीचे पठाण. याच पतौडी घराण्यात मंसूर अली खान पतौडी यांचा जन्म झाला. ‘टायगर’ या टोपणनावाने ओळखला जाणारा नवाब मन्सूर अलीखान पतौडी हासुद्धा वडील इफ्तिकार अलींसारखाच क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. या नवाची विकेट ही बॉलिवूड अभिनेत्रीने घेतली होती. टायगर हे अभिनेत्री शर्मा टागोरच्या प्रचंड प्रेमात होते.
वाचा: ना शेरवानी ना घोडा ना फेटा; जीमच्या लूकमध्ये आमिरच्या जावयाची हटके वरात

‘कश्मीर की कली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि शर्मिला रातोरात स्टार झाल्या. त्यांचे लाखो चाहते होते. यामध्ये मंसूर अली खान देखील होते. कोलकत्तामध्ये झालेल्या एका पार्टीत त्या दोघांची भेट झाली. पाहताच क्षणी मंसूर शर्मिलाच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे शर्मिला यांना इंप्रेस करणे तेव्हा फार कठीण होते. मंसूर अली खान यांना अनेक प्रयत्न करावे लागले होते. त्यासाठी त्यांनी शर्मिला यांना रेफ्रिजरेटर दिला होता.

त्याकाळी रेफ्रिजरेटर घेणे ही खूप मोठी गोष्ट होती. त्याची किंमत देखील खूप जास्त होती. शर्मिलाला इंप्रेस करण्यासाठी मंसूर अली खानने तो गिफ्ट म्हणून दिला. त्याचबरोबर त्यांनी अनेक वेळा शर्मिला यांना फूले आणि पत्रदेखील पाठवले होते. विशेष म्हणजे मंसूर अली खान यांचे प्रयत्न पाहून तब्बल ४ वर्षांनी शर्मिला यांनी त्यांचा होकार कळवला. पण त्यावेळी त्यांच्या अंतरधर्म विवाहाला अनेकांचा विरोध होता. पतौडी कुटुंबीयांनी मात्र थाटामात शर्मिला आणि मंसूर अली खान यांचे लग्न लावून दिले होते.

WhatsApp channel