बॉलिवूडचा अतिशय प्रसिद्ध चित्रपट निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून करण जोहर ओळखला जातो. आज त्याचा प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो. ९०च्या दशकात अनेक कलाकारांचे करण जोहरसोबत काम करण्याचे स्वप्न होते. आज, २५ मे रोजी करण जोहरचा वाढदिवस आहे. करण त्याचा ५२ वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करताना दिसणार आहे. करणने आजवर अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पण तुम्हाला माहितीये का एकेकाळी करण जोहर एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता. आज करणच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी...
करणचा जन्म २५ मे रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे वडील यश जोहर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. त्यांनीच धर्मा प्रोडक्शन ही इतकी मोठी कंपनी उभी केली आहे. करण जोहरने मुंबईतील ग्रीनलान्स हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकनॉमिक्समधून पदवी घेतली. चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याची इच्छा असल्यामुळे पुढे जाऊन करणने काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू करणला दिग्दर्शनाचे काम जमू लागले. त्याने सुरुवातीला दिग्दर्शन केलेले चित्रपट फारसे चालले नाहीत. पण त्यांचे कधीही मागे वळून पाहिले नाही. आज करण जोहर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे.
वाचा: 'फॅमिली मॅन ३' सीरिजमध्ये शरद केळकर दिसणार की नाही?, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा
करण जोहरने चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरील कॉफी विथ करण या शोने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसतात. तसेत हा शो चर्चेत देखील असतो. एकदा याच शोमध्ये त्याने एकेकाळी अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. तसेच त्याने त्या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा देखील केला होता. तिच्यासाठी त्याने एका उंच टेकडीवरुन देखील उडी मारली होती.
वाचा: कभी नहीं मारा चौका तो बाद में नहीं मिलेगा मौका; "होय महाराजा"चा मजेशीर ट्रेलर पाहिलात का?
करण जोहरचे अभिनेत्री ट्विंकल खन्नावर प्रचंड प्रेम होते. ते दोघेही एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी ट्विंकल करणसाठी कॅनटीनमधून जेवण चोरुन आणायची असे करणने म्हटले होते. तसेच ट्विंकलने 'मिस फनी बोन्स' या पुस्तकात करण जोहरच्या एकतर्फी प्रेमाचा उल्लेख केला आहे.
वाचा: ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये महेश मांजरेकर का करणार नाहीत सूत्रसंचालन? समोर आलं मोठं कारण!
संबंधित बातम्या