मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hrithik Roshan: बालपणी 'या' समस्येचा सामना केलेला हृतिक आज आहे सुपरस्टार!

Hrithik Roshan: बालपणी 'या' समस्येचा सामना केलेला हृतिक आज आहे सुपरस्टार!

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 10, 2024 07:22 AM IST

Hrithik Roshan Birthday Special: बालपणी हृतिकला एक आजार झाला होता. त्यामुळे सर्वांना चिंता वाटू लागली होती. मात्र, हृतिकने त्या आजारावर मात केली.

Happy Birthday Hrithik Roshan
Happy Birthday Hrithik Roshan ( hrithikroshan / Instagram )

बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. त्याने फिटनेस आणि डान्स कौशल्याच्या आधारावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला होता. आज १० जानेवारी रोजी हृतिकचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिकने मुख्य अभिनेता म्हणून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. मात्र, त्याआधी त्याने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले आहे. १९८०मध्ये आलेला 'आशा' हा हृतिकचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी हृतिक रोशनचे वय अवघे ६ वर्षे होते. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या हृतिकला लहानपणापासूनच अडखळत बोलण्याची समस्या होती. मात्र, त्याने कधीच हार मानली नाही. या समस्येशी तो नेटाने लढत राहिला आणि त्यावर मात करून सुपरस्टार बनला.
वाचा: द केरळ स्टोरी ते ज्विगेटो; या आठवड्यात ओटीटीवर पाहायला 'हे' सिनेमे

हृतिक रोशन याने वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी आपल्या आजोबांच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. हृतिक रोशनचे आजोबा ओम प्रकाश यांनी त्याला ‘आशा’ चित्रपटात एक भूमिका दिली होती. या भूमिकेसाठी हृतिक रोशनला १०० रुपये इतके मानधन मिळाले होते. ही हृतिकच्या आयुष्यातली पहिली कमाई होती. यानंतर हृतिकने मनोरंजन विश्वात स्थिरावण्यासाठी मोठा संघर्ष केला. यासाठी त्याने वडील राकेश रोशन यांच्या चित्रपटांच्या सेटवर पडतील ती कामे करायला सुरुवात केली. वेळेप्रसंगी त्याने कलाकारांना चहा देण्याचे काम देखील केले होते. यातूनच त्याने स्वतःला सिद्ध केलं.

हृतिक रोशनने आपल्या दमदार करिअरमध्ये ‘कहो ना प्यार है’, ‘धूम २’, ‘अग्निपथ’, ‘जोधा अकबर’, ‘क्रिश’, ‘बँग बँग’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कोई मिल गया’, ‘सुपर ३०’, ‘काबिल’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘वॉर’, ‘विक्रम वेधा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

WhatsApp channel

विभाग