मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सर्वात महागडा घटस्फोट! करिश्माला पतीकडून पोटगी म्हणून मिळतात 'इतके' रुपये
करिश्मा कपूर
करिश्मा कपूर (HT)
25 June 2022, 8:53 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
25 June 2022, 8:53 IST
  • करिश्माने २००३मध्ये संजयशी लग्न केले होते. सुरुवातील दोघेही आनंदी होते. पण लग्नाच्या पाच-सहा वर्षांनंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. त्यांनी लग्नाच्या जवळपास १३ वर्षांनंनतर विभिक्त होण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे करिश्मा कपूर. आज २५ जून रोजी करिश्माचा वाढदिवस आहे. करिश्माने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकेकाळी ती तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायची. तिने दिल्लीमधील व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले. लग्नानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. पण लग्नानंतर खटके उडू लागल्यामुळे करिश्माने पतीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर करिश्माला पोटगी म्हणून किती रक्कम मिळाली असा प्रश्न अनेकांना पडतो.

ट्रेंडिंग न्यूज

करिश्माने २००३मध्ये संजयशी लग्न केले होते. सुरुवातील दोघेही आनंदी होते. पण लग्नाच्या पाच-सहा वर्षांनंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. त्यांनी लग्नाच्या जवळपास १३ वर्षांनंनतर विभिक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर करिश्माने लग्नाबाबत अनेक खुलासे केले होते. लग्नानंतर करिश्मा आणि संजय हनिमूनला गेल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या होत्या. हळूहळू त्यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते. संजयने हनिमूनला मला विकण्याचा प्रयत्न केला होता असा अरोप करिश्माने केला होता. तसेच सासरच्यांनी देखील चुकीची वागणूक दिली असा खुलासा करिश्माने केला होता. संजय आणि त्याच्या कुटुंबीयांना कंटाळून करिश्माने लग्नाच्या १३ वर्षांनंतर २०१६मध्ये घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतर मुलांचा ताबा हा करिश्माकडे आहे. मुलांचे योग्य पद्धतीने संगोपन व्हावे म्हणून संजयने खार येथील घर करिश्माच्या नावावर केले आहे. तसेच दर महिन्याला लाखो रुपये संजय कपूर मुलांच्या खर्चासाठी करिश्माला देतो. रिपोर्ट्सनुसार, जवळपास १० लाख रुपये तो देत असल्याचे म्हटले जाते. त्याने मुलांसाठी १४ कोटी रुपयांचा बाँड केला असल्याचे म्हटले जाते. वर्षातून दोन महिने तो मुलांसोबत घालवतो.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग