मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे ओळखले जातात. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतात. आज १६ जानेवारी रोजी केदार शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी...
केदार शिंदे यांच्या पत्नीचे नाव बेला आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारामध्ये बेलाने साथ दिली. दोघांनीही मिळून त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा सामना केला आहे. पण तुम्हाला त्या दोघांची लव्हस्टोरी माहिती आहे का? त्यांच्या आयुष्यात १ एप्रिल अतिशय महत्त्व आहे. नेमकं काय ते चला जाणून घेऊया..
वाचा: आमिर खानचा लेक जुनैद सध्या काय करतो?
केदार शिंदे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये ते म्हणाले की, '१ एप्रिल १९९१.. दोन वर्षांची उमेदवारी केल्यावर तीने बेला शिंदे हिने मला होकार दिला. अंकुश चौधरी होता माझ्यासोबत. तीला भेटून ट्रेनचा प्रवास करत आम्ही दादर पुर्वेकडील एका इराणी हॅाटेलात चहा- बनमस्का खाताना अचानक आठवलं, "आयला अंकी, मला बेलाने एप्रिल फूल तर केलं नसेल ना?" त्यावेळी मोबाईल नव्हते. त्यात तिच्या घरच्या लॅंडलाईनवर फोन करण्याची हिंमत अजिबात नव्हती. ती पुन्हा जोवर भेटली नाही तोवर माझ्यासाठी तीने एप्रिल फूल केलं यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण पण पण.... ती त्या १ एप्रिल रोजी माझ्या आयुष्यात आली ती, बेला के फूल बनून. आज १ एप्रिल २०२२.. घरातून निघण्याच्या आधी पुन्हा आम्ही त्या आठवणीत रमलो. अंकुश चौधरी तुला मीस केलं रे.'
केदार शिंदे आणि बेलाच्या लग्नाला २७ वर्षे झाली आहेत. त्या दोघांच्या सुखी संसार सुरु आहे. लग्नाच्या २५व्या वाढदिवशी त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले. या लग्नाला काही मोजक्याच लोकांना बोलावले होते. आज केदार शिंदे यांचा वाढदिवस आहे. तोही ते कुटुंबीयांसोबत साजरा करणार आहेत.
संबंधित बातम्या