मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Karishma Kapoor: 'पतीने केला होता विकण्याचा प्रयत्न', करिश्मा कपूरसोबत नेमकं काय झालं होतं?

Karishma Kapoor: 'पतीने केला होता विकण्याचा प्रयत्न', करिश्मा कपूरसोबत नेमकं काय झालं होतं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 25, 2024 07:33 AM IST

Karishma Kapoor Birthday: आज २५ जून रोजी करिश्मा कपूरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

Karishma Kapoor: करिश्मा कपूर (ANI Photo)
Karishma Kapoor: करिश्मा कपूर (ANI Photo) (Nitin Lawate )

कपूर घराण्यातील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूर ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जीवावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. पण चित्रपटांसोबतच करिश्मा कपूर नेहमी खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. आज २५ जून रोजी करिश्माचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

करिश्माने दिल्लीमधील व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले. लग्नानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. पण लग्नानंतर खटके उडू लागल्यामुळे करिश्माने पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये करिश्माराने संजयच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले.
वाचा: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा स्विकारणार का मुस्लिम धर्म? जहीरच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया

प्रेग्नंट करिश्माला सासरच्यांनी दिला होता त्रास

'मी जेंव्हा प्रेग्नेंट होते त्यावेळी संजय कपूर हा माझ्यासाठी एक ड्रेस घेऊन आला होता. मात्र, तो ड्रेस मला फिट बसत नव्हता. त्यानंतर संजय कपूर याने त्याच्या आईला बोलावून मला चापट मारण्यास सांगितले होते' असे करिश्मा एका मुलाखतीमध्ये सांगताना म्हणाली होती.
वाचा: जमिनीवर बसून अनिल कपूरचा सोनाक्षीसोबत डान्स, जहीरने छैय्या-छैय्यावर डान्स करत केले इम्प्रेस

ट्रेंडिंग न्यूज

पतीने केला विकण्याचा प्रयत्न

करिश्माने २००३मध्ये संजयशी लग्न केले होते. सुरुवातील दोघेही आनंदी होते. पण लग्नाच्या पाच-सहा वर्षांनंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. त्यांनी लग्नाच्या जवळपास १३ वर्षांनंनतर विभिक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर करिश्माने लग्नाबाबत अनेक खुलासे केले होते. लग्नानंतर करिश्मा आणि संजय हनिमूनला गेल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या होत्या. हळूहळू त्यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते. संजयने हनिमूनला मला विकण्याचा प्रयत्न केला होता असा अरोप करिश्माने केला होता. तसेच सासरच्यांनी देखील चुकीची वागणूक दिली असा खुलासा करिश्माने केला होता.
वाचा: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रिसेप्शनला नेसली लाल रंगाची साडी, किंमत ऐकून बसेल धक्का

संजय आणि त्याच्या कुटुंबीयांना कंटाळून करिश्माने लग्नाच्या १३ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर २०१६मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करिश्मा दोन्ही मुलांना घेऊन राहते. पण तिने पोटगी म्हणून घेतलेली रक्कम सर्वांचे डोळे पांढरे करणारी होती.

WhatsApp channel