Kareena Kapoor: सैफ अली खान आणि शाहीद कपूर आधी 'या' खानला करीना कपूर करत होती डेट-birthday special kareena kapoor talked about personal life ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kareena Kapoor: सैफ अली खान आणि शाहीद कपूर आधी 'या' खानला करीना कपूर करत होती डेट

Kareena Kapoor: सैफ अली खान आणि शाहीद कपूर आधी 'या' खानला करीना कपूर करत होती डेट

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 21, 2024 08:06 AM IST

Kareena Kapoor Birthday: आज २१ सप्टेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्याविषयी...

Kareena Kapoor (AFP)
Kareena Kapoor (AFP)

बॉलिवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करीनाने एक मस्तीखोर अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण चित्रपटांसोबतच करीना तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. ती सैफ अली खान आधी एका खानला डेट करत होती. आता हा खान कोण होता असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आज २१ सप्टेंबर रोजी करीनाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

करीनाच्या चित्रपटांविषयी

अभिनेत्री करीना कपूर खानने २००० साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव रेफ्यूजी होते. या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण करीनाची भूमिका मात्र प्रेक्षकांच्या मनात उतरली. त्यानंतर करीनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिला एकापाठोपाठ एक चित्रपटांची ऑफर येऊ लागली. तिने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत काम केले. पण करीना काम करताना अभिनेता सैफ अली खानच्या प्रेमात होती.

करीनाने केले सैफशी लग्न

‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ -करिना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ‘कुरबान’ चित्रपटातही या दोघांनी स्क्रिन शेअर केली. या चित्रपटामध्ये या दोघांची रोमॅण्टीक केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यानंतर तात्काळ या जोडीने लग्नाचा निर्णय घेता आणि ही जोडी विवाहबंधनात अडकले. करीनाने २०१२ मध्ये तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. सैफ आणि करिनाची जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या दोघांची प्रेमकथाही तितकीच रंजक असल्याचे सांगण्यात येते. मात्र करिनाने सैफला पसंत करण्यापूर्वी बॉलिवूडमधील दुसऱ्याच एका खानची निवड केल्याचे समोर आले आहे.

सैफ पूर्वी या खानच्या होती प्रेमात

सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी आपल्या सौंदर्याने साऱ्यांना घायाळ करणारी करीना कधीकाळी अभिनेता फरदीन खानच्या प्रेमात होती. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘खुशी’ या चित्रपटात करीना आणि फरदीन यांनी एकत्र काम केले. या चित्रपटाच्या दरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. आजही दोघे चांगले मित्र-मैत्रिणी असल्याचे पाहायला मिळते.
वाचा: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर झोपले अन्...; जाणून घ्या महेश भट्ट यांच्यासोबत नेमकं काय झालं होतं

हृतिक आणि शाहिदला देखील केले डेट

पतौडी कुटुंबाची सून असलेल्या करीनाचे नाव बॉलिवूडमधील इतरही काही कलाकारांसोबत जोडण्यात आले. त्यामध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि शाहिद कपूरसोबतही जोडले गेले होते. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी करीना-हृतिकची जवळीकता वाढली होती. मात्र या गोष्टीची चुणूक हृतिकच्या पत्नीला सुझैनला लागल्यामुळे करीना- हृतिकच्या नात्यात दुरावा आला. विशेष म्हणजे त्यानंतर ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ या चित्रपटात ही जोडी शेवटची एकत्र झळकली होती. त्यानंतर अद्यापही या जोडीने एकत्र स्क्रिन शेअर केलेली नाही.

Whats_app_banner
विभाग