कधीकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाठारे मनोरंजन विश्वात कशा आल्या? वाचा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कधीकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाठारे मनोरंजन विश्वात कशा आल्या? वाचा...

कधीकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाठारे मनोरंजन विश्वात कशा आल्या? वाचा...

Published Apr 08, 2024 08:27 AM IST

कोणत्याही मालिकेत मुख्य भूमिका न साकारताही इतका मोठा चाहता वर्ग कमावण्याची किमया सुप्रिया पाठारे यांनी करून दाखवली.

कधीकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाठारे मनोरंजन विश्वात कशा आल्या? वाचा...
कधीकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाठारे मनोरंजन विश्वात कशा आल्या? वाचा...

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सुप्रिया पाठारे यांनी मराठी मनोरंजन विश्वात अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारत आपली एक हक्काची जागा निर्माण केली आहे. कोणत्याही मालिकेत मुख्य भूमिका न साकारताही इतका मोठा चाहता वर्ग कमावण्याची किमया सुप्रिया पाठारे यांनी करून दाखवली. आज, ८ एप्रिल रोजी सुप्रिया पाठारे आपला ५१वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या करिअर विषयी काही खास गोष्टी...

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा जन्म मुंबईच्या सँडर्ड्स रोड येथील उमरखाडी परिसरामध्ये झाला. अभिनयाची किंवा मनोरंजन विश्वाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांना नव्हती. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर सुप्रिया पाठारे यांना अभिनयाची गोडी लागली होती. शाळेत असल्यापासून सुप्रिया पाठारे यांना नाटकांत सहभागी व्हायला फार आवडत होतं. सातवीत असताना सुप्रिया पाठारे यांनी स्वतः देखील एक नाटक लिहिलं होतं. अभिनेत्री अर्चना नेवरेकर या सुप्रिया पाठारे यांच्या बहीण आहेत. त्यावेळी अर्चना या नाटकात अभिनय करायच्या आणि सुप्रिया या त्यांची साथ देण्यासाठी सोबत जायच्या. यासाठी अर्चना त्यांना दिवसाचे १०० रुपये द्यायच्या.

‘फ्लॉवर नही फायर है...’ म्हणणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुनबद्दल ‘या’ गोष्टी कधी ऐकल्यात का?

घरकाम करायला सुरुवात केली!

सुप्रिया पाठारे यांना लहानपणापासूनच ‘भरत नाट्यम’ या नृत्य प्रकाराची प्रचंड आवड होती. आपणही भरतनाट्यम शिकलं पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं. मात्र, आपल्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसलेल्या सुप्रिया यांना भरतनाट्यम शिकण्यासाठी पैसे कुठून येणार? हा प्रश्न नेहमीच त्रास द्यायचा. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी सुप्रिया पाठारे यांनी घरकाम करायला सुरुवात केली होती. त्यांनी लोकांच्या घरी धुणीभांडी केली, कपडे धुतले आणि इतरही अनेक घरकामे केली. या कामाच्या मोबदल्यात त्यांना शंभर रुपये मिळायचे. या शंभर रुपयात त्या ७० रुपये आपली फी भरायच्या आणि उरलेले ३० रुपये आईच्या हाती ठेवायच्या.

अशी झाली कारकिर्दीची सुरुवात!

पुढे त्यांनी वामन केंद्रे यांच्या नाट्य शाळेत जाण्यास सुरुवात केली. वामन केंद्रे यांच्या मदतीने सुप्रिया पाठारे यांना ‘तीन पैशांच्या तमाशा’ या नाटकात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या नाटकातून सुप्रिया पाठारे यांनी आपली अभिनय क्षमता सगळ्यांनाच दाखवून दिली. या मिळालेल्या संधीचं सुप्रिया पाठारे यांनी सोनं केलं. यानंतर त्यांना मनोरंजन विश्वात कामं मिळायला सुरुवात झाली. त्यांच्या करिअरची सुरुवात खऱ्या अर्थानं मराठी नाटक ‘डार्लिंग डार्लिंग’ मधून झाली होती. सोळा वर्षांच्या कारकीर्दीत सुप्रिया पाठारे यांनी मनोरंजन विश्वात आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Whats_app_banner