मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अक्षय खन्ना अजूनही अविवाहित का? जाणून घ्या कारण

अक्षय खन्ना अजूनही अविवाहित का? जाणून घ्या कारण

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 28, 2022 10:06 AM IST

बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत जे अद्याप अविवाहित आहेत. या यादीमधील एक नाव म्हणजे अक्षय खन्ना. अक्षयने स्वत: या मागचे कारण एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

अक्षय खन्ना
अक्षय खन्ना (HT)

एकेकाळी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. त्याने ‘ताल’, ‘हलचल’, ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘हंगामा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून तो क्वचितच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसत आहे. आज २८ मार्च रोजी त्याचा वाढदिवस आहे. वयाची ४० ओलांडून गेल्यानंतरही अक्षय अविवाहित का आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याच्या वाढदिवशी चला जाणून घेऊया त्यामागचे कारण...

ट्रेंडिंग न्यूज

बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत जे अद्याप अविवाहित आहेत. या यादीमधील एक नाव म्हणजे अक्षय खन्ना. कित्येकांनी तर तो लग्न करुन खासगी आयुष्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी असे करत असल्याचेही तर्क लावले. पण वास्तवात मात्र परिस्थिती फारच वेगळी आहे. तसेच त्याचे नाव कधीही कोणत्या अभिनेत्रीशी जोडले गेलेले नाही किंवा तो कोणासोबत फिरतानाही दिसला नाही. पण याबाबत अक्षयने स्वत: एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.

एकदा अक्षयला त्याने अद्याप लग्न का केलेले नाही? असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत तो म्हणाला, 'लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे मी कुणालाही कमिटमेंट देण्यास अजून तयार नाही. प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी आपण विचार करतो. लग्न हा असा निर्णय आहे ज्याच्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते.'

पुढे तो म्हणाला, 'लग्नानंतर मुलांचा विचार करावा लागतो. त्यांची जबाबदारी वाढते, बाकी गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला त्यांना वेळ द्यावा लागतो. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मी त्यासाठी अजूनही तयार नाही.'

IPL_Entry_Point