मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aadesh Bandekar Birthday: महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ आदेश बांदेकर यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?

Aadesh Bandekar Birthday: महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ आदेश बांदेकर यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 18, 2024 08:01 AM IST

Happy Birthday Aadesh Bandekar: घरोघरी जाऊन त्या घरातील गृहलक्ष्मीचा सन्मान करणारे आदेश बांदेकर समस्त महिला वर्गाचे लाडके भावोजी बनले.

Happy Birthday Aadesh Bandekar
Happy Birthday Aadesh Bandekar

Happy Birthday Aadesh Bandekar: छोट्या पडद्यावरच्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहचलेले महाराष्ट्राचे लाडके भावोजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांचा आज (१८ जानेवारी) वाढदिवस आहे. तब्बल १८ वर्षांहून अधिक काळ आणि महाराष्ट्रातली हजारो घरं आदेश बांदेकर यांनी पालथी घातली. याच कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना महाराष्ट्रातील प्रेक्षकाच्या मनातच नाही तर घरात देखील हक्काची जागा मिळाली. घरोघरी जाऊन त्या घरातील गृहलक्ष्मीचा सन्मान करणारे आदेश बांदेकर समस्त महिला वर्गाचे लाडके भावोजी बनले. चला तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी...

अभिनेते आदेश बांदेकर यांचा जन्म १८ जानेवारी १९६६ रोजी अलिबागमध्ये झाला. मूळचे अलिबागचे असणारे आदेश बांदेकर, कुटुंब मुंबईत स्थायिक झाल्याने मुंबईकर झाले. त्यांचं बालपण मुंबईतल्या लालबाग परळ या भागामध्ये गेलं. आदेश बांदेकर हे त्यांच्या तीन भावंडांमध्ये मधले होते. लहानपणापासूनच खोडकर असलेल्या आदेश बांदेकर यांना अभ्यासातही फारसा रस नसायचा. मात्र, कलेशी संबंधित अनेक गोष्टींची त्यांना मनापासून आवड होती. शाळा आणि चाळीत असताना तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये आदेश बांदेकर आवर्जून सामील व्हायचे. नाटुकली असो वा डान्स आदेश नेहमीच सतेज गाजवायचे. शाळेतही त्यांनी अनेक बक्षीसं पटकावली होती.

Tharala Tar Mag 17th Jan: अर्जुनच्या हाती पक्के पुरावे! आश्रमाच्या केसमधून मधुभाऊ सुखरूप सुटणार का?

शालेय शिक्षण झाल्यानंतर आदेश बांदेकर यांनी कॉमर्समधून पदवी शिक्षण घेतलं. दरम्यानच्या काळात ते आपली नाटकांची आणि अभिनयाची आवड जपत होते. त्यांना ढोल वाजवायला खूप आवडायचं. यात ते पारंगत होते. अनेक कार्यक्रमांमध्ये, मिरवणुकांमध्ये ते अगदी लग्नाच्या वारातीतही आदेश बांदेकर यांनी ढोल वाजवला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते हळूहळू चित्रपट, मालिका आणि नाट्यभूमीकडे वळू लागले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी नोकरी करण्यास देखील सुरुवात केली होती. नोकरी करत असतानाच त्यांनी एका नाट्यस्पर्धेत भाग घेतला होता. इतकंच नाही तर, त्यांनी यात बक्षीस देखील पटकावलं.

नोकरी करत असतानाच आदेश बांदेकर यांना दूरदर्शनवरील ‘टाक धिना धीन’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची ऑफर आली. आदेश बांदेकर यांनी कसलाही विचार न करता ही ऑफर स्वीकारली आणि सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. याच कार्यक्रमामधून त्यांनी आपला मनोरंजन विश्वातील प्रवास सुरू केला होता. या दरम्यान त्यांनी काही नाटकांमध्येही काम केले. तर, ‘अवंतिका’, ‘अवघाची संसार’ सारख्या मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. २००४मध्ये ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून ते पुन्हा सूत्रसंचालानाकडे वळले आणि महाराष्ट्रातील समस्त महिला वर्गाचे लाडके भावोजी बनले.

WhatsApp channel

विभाग