
अभिनेत्री जुही चावला ही ९०च्या दशकातील बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ‘डर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘इश्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला. जुहीने त्या काळात बॉलिवूडमधील प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले होते. आज १३ नोव्हेंबर रोजी जुहीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी. एक काळ असा होता की बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा जुहीच्या प्रेमात पडला होता. पण जुहीने त्याला नकार दिला. त्यामागे काय कारण असेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
जुहीने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये तिने सलमान खानने लग्नासाठी विचारले होते याबात खुलासा केला होता. जुहीने या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'जेव्हा करिअरला सुरुवात केली तेव्हा सलमान हा 'द सलमान खान' नव्हता. जो आज आहे. तेव्हा एका चित्रपटाची मला ऑफर आली होती त्यामध्ये सलमान मुख्य भूमिकेत होता. खरे सांगायचे तर मी त्यावेळी कोणालाही व्यवस्थित ओळखत नव्हते. ना सलमान खानला, ना आमिर खानला, इंडस्ट्रीमधील कोणालाही मी ओळखत नव्हते. त्यातच मला आलेल्या चित्रपटाची ऑफर नाकारावी लागली होती.'
वाचा: पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात! जाणून घ्या बोनी कपूर आणि श्रीदेवीची लव्हस्टोरी
पुढे ती म्हणाली, 'सलमान मला आजपण त्याच्यासोबत चित्रपट न केल्यामुळे टोंमणे मारतो. तो जेव्हा भेटतो तेव्हा मला बोलत असतो की तू माझ्यासोबत एकही चित्रपट केला नाहीस. आम्ही एकत्र स्टेज शोदेखील केला नाही. दिवाना मस्ताना चित्रपटात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.'
जुहीने कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना १९९५मध्ये बिझनेसमन जय मेहता यांच्यासोबत लग्न करून संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. तिने लग्नगाठही बांधली. पण, जुहीने हे लग्न बरेच दिवस सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. या मागचे कारण देखील तितकेच मोठे होते.
संबंधित बातम्या
