
नाना पाटेकर हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नवे नाही. नानांनी फक्त आपल्या आवाजाच्या आणि संवाद फेकीच्या कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नानांना त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. इतर अभिनेत्यांसारखा रेखीव चेहरा नसताना देखील फक्त अभिनयाच्या जोरावर ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते ठरले. आज १ जानेवारी रोजी नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी...
प्रत्येक वयातील प्रेक्षक हा नानांचा चाहता आहे. त्यांना सर्वजण नाना म्हणूनच सर्वजण ओळखतात. पण तुम्हाला नाना पाटेकर यांचे खरे नाव माहिती आहे का? नाही ना चला जाणून घेऊया...
वाचा: व्हायरल झालेल्या बोल्ड सीनवर प्रियाच्या वडिलांची प्रतिक्रिया कशी होती?
नाना पाटेकर हे रायगडमध्ये राहणाऱ्या एका मराठी कुटुंबात १ जानेवारी १९५१ रोजी जन्माला आले. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर पाटेकर होते. त्यांची आई संजनाबाई पाटेकर गृहिणी होत्या. नाना पाटेकर यांना अशोक आणि दिलीप पाटेकर असे दोन भाऊ आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव नीलकांती पाटेकर. नीलकांती या बँकेत काम करत होत्या. आज नाना हे पत्नीसोबत राहात नाहीत. नाना आणि नीलकांती यांना दोन मुले होती. त्यामधील एकाचे निधन झाले. दुसऱ्या मुलाचे नाव मल्हार असे आहे.
नाना पाटेकर यांनी १९७८ साली अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना २०१३मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले.
नाना पाटेकर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा 'ओले आले' हा चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबतच मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव यांच्या ही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
संबंधित बातम्या
