मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jackie Shroff Birthday: करिअरच्या सुरुवातीला चाळीत राहणाऱ्या जॅकी श्रॉफचे खरे नाव काय? जाणून घ्या

Jackie Shroff Birthday: करिअरच्या सुरुवातीला चाळीत राहणाऱ्या जॅकी श्रॉफचे खरे नाव काय? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 01, 2024 07:47 AM IST

Jackie Shroff Birthday Special: बॉलिवूडचा जग्गू दादा अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ आज १ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी

Actor Jackie Shroff (ANI Photo)
Actor Jackie Shroff (ANI Photo) (Girish Srivastav)

Jackie Shroff Birthday: आपल्या अभिनय कौशल्याने आणि बोलण्याच्या अनोख्या स्टाइलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. ते बॉलिवूडमध्ये जग्गू दादा या नावाने ओळखले जातात. त्यांचा साधेपणा अनेकांची मने जिंकताना दिसतो. अभिनेता नेहमीच आपल्या मातीशी नाळ जोडून राहिलेला दिसतो. जॅकी श्रॉफ यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ रोजी महाराष्ट्रात झाला. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या जॅकी श्रॉफ यांचे बालपण मात्र अतिशय खडतर होते. सगळ्याला तोंड देत त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. आज जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

शाळेत असताना बदलले नाव
एकापेक्षा एक दमदार व्यक्तिरेखा साकारून जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांच्या हृदयात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. पण, बॉलिवूडमध्ये जॅकी श्रॉफ या नावाने जरी ते प्रसिद्ध असले, तरी ते त्यांचे खरे नाव नाही. जॅकी श्रॉफ यांचे खरे नाव जय किशन काकूभाई श्रॉफ आहे. जयकिशन काकूभाई श्रॉफ यांचे जॅकी श्रॉफ हे नामकरण शाळेत असतानाच झाले होते. इतक्या लांबलचक नावामुळे शाळेत असताना त्यांचे मित्र त्यांना जॅकी या नावानेच हाक मारू लागले. तेव्हापासून जयकिशन काकूभाई श्रॉफ हे जॅकी श्रॉफ झाले.
वाचा: पुरस्कार तुम्हाला मिळालाय पण उर आमचा भरुन आलाय; अशोक मामांसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट

जॅकी श्रॉफ मुंबईतील चाळीत राहायचे
सुभाष घई यांच्या हिरो या चित्रपटातून जॅकी श्रॉफ यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी जॅकी श्रॉफ या नावानेच मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. पहिल्याच चित्रपटातून त्यांना तुफान प्रसिद्धी मिळाली होती. 'हिरो' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जॅकी श्रॉफचे लाखो चाहते होते. त्यामुळे प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला जॅकीने आपला चित्रपट साईन करावा असे वाटायचे. त्यासाठी बॉलिवूडचे बडे दिग्दर्शक त्याच्या घरी चकरा मारायचे. त्याकाळात इतकं यश मिळून देखील जॅकी श्रॉफ मुंबईतील चाळीत राहायचे. त्यामुळे जॅकी टॉयलेटमध्ये असताना निर्माता-दिग्दर्शक टॉयलेटच्या बाहेर उभे राहून त्यांची वाट बघायचे.

अतिशय गरिबीतून जॅकी श्रॉफ चित्रपटांच्या दुनियेत आला होता, त्यामुळे त्याला परिस्थितीची जाणीव आणि किंमत चांगलीच ठाऊक होती. यामुळेच 'हिरो' चित्रपट हिट झाल्यानंतरही जॅकीने चाळीमध्ये राहणे सोडले नाही. चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटात जॅकीला कास्ट करण्यासाठी चाळीत जावे लागले. विधू विनोद चोप्रा आणि महेश भट्ट सारखे मोठे दिग्दर्शकही जॅकी श्रॉफला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी चाळीत रांगा लावून असायचे.

WhatsApp channel

विभाग