Prasad Oak Birthday Special: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा मराठमोळा कलाकार प्रसाद ओक एक उत्तम दिग्दर्शक म्हणूनही नावारूपास आला आहे. त्याने अभिनेता म्हणून काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर काही हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आज १७ नोव्हेंबर रोजी प्रसाद ओकचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी खास गोष्टी...
प्रसाद ओकचा जन्म १७ फेब्रुवारी १९७५ साली पुण्यात झाला आहे. पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले. पुढे पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयातून त्याने पदवीचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. त्यामुळे एक दिवस प्रसाद मोठा अभिनेता बनेल असा विश्वास कुटुंबीयांना होता.
वाचा: पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! 'जाऊ बाई गावात'चा एक विशेष एपिसोड पाहण्याची संधी
प्रसादने सुरुवातीला नाटकात काम केले आहे. त्याचे पहिले नाव श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्यासोबत होते. या नाटकामुळे त्याला १९९३ साली पहिली मालिका मिळाली. त्या मालिकेचे नाव बंदीनी होते. प्रसादची ही पहिली वहिली मालिका चांगलीच गाजली. त्यानंतर त्याने 'अंधाराच्या पारंब्या', 'अवघाची संसार', महाराष्ट्राची हास्यजत्रा, दामिनी, घरकुल, चार दिवस सासूचे, अवघाची संसार, भांडा सौख्यभरे, समारंभ, असंभव, आभाळमाया, पिंपळपान, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरू, हम तो तेरे आशिक है, क्राइम पेट्रोल या मालिकांमध्ये तो दिसला.
प्रसाद ओकचा बॅरिस्टर हा चित्रपट पहिला ठरला. या चित्रपटातून त्याला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर त्याने हिप हिप हुर्रे, खेळ मांडला, निर्मला, धतिंग धिंगाणा, बाळकडू, डॉक्टर रमाबाई, 7 रोशन व्हिला, शिकारी, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, ये रे ये रे पैसा, पिकासु, हिरकणी, धुरळा, ऐका दाजिबा, एक डाव धोबी पछाड, लगे रहो मुन्नाभाई, कलियुग, जेहेर, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझी घरी या चित्रपटांमध्ये काम केले. या सगळ्यात त्याचा 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट विशेष गाजला. आज प्रसादकडे एक यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पाहिले जाते. त्याचा प्रत्येक चित्रपट हा चाहत्यांसाठी मेजवानी ठरतो.
संबंधित बातम्या