Deepika Padukone Lovestory: 'राम-लीला'मधील किसिंग सीन ठरला टर्निंग पाईंट, वाचा 'दीप-वीर'ची लव्हस्टोरी-birthday special deepika padukone and ranveer singh lovestory ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone Lovestory: 'राम-लीला'मधील किसिंग सीन ठरला टर्निंग पाईंट, वाचा 'दीप-वीर'ची लव्हस्टोरी

Deepika Padukone Lovestory: 'राम-लीला'मधील किसिंग सीन ठरला टर्निंग पाईंट, वाचा 'दीप-वीर'ची लव्हस्टोरी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 05, 2024 08:25 AM IST

Deepika Padukone Birthday: आज ५ जानेवारी रोजी अभिनेत्री दीपिका पादूकोणचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया दीपिका आणि रणवीरची लव्हस्टोरी...

Deepika Padukone and ranveer singh
Deepika Padukone and ranveer singh

बॉलिवूडमधील सध्याची अतिशय हिट आणि हॉट अभिनेत्री म्हणून दीपिका पादूकोण ओळखली जाते. तिने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधून चाहत्यांची मने जिंकली. त्या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना पाहायला आवडते तेवढीच ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आज ५ जानेवारी रोजी दीपिकाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी...

रणवीर आणि दीपिका हे बी-टाउनमध्ये 'दीप-वीर' या नावावे विशेष ओळखले जातात. त्यांची ओळख कशी झाली, कुठे झाली हे सर्व जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सर्वात पहिले त्यांनी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये एकमेकांना पाहिले होते. त्यानंतर २०१३मध्ये 'गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर यांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
वाचा: अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरी, लग्नातील दागिने गायब

'गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात अनेक रोमँटिक सीन्स आहेत. एका किसिंग सीनच्या वेळी दोघेही एकमेकांमध्ये इतके गुंतले होते ती दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही थांबले नाहीत. ते एकमेकांना किस करत राहिले. त्यानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले.

दीपिका आणि रणवीरने संजय लीला भन्साळी यांच्या तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. २०१३ मध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, दुसरा २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाजीराव- मस्तानी’ आणि तिसरा ‘पद्मावत’ या चित्रपटात काम केले. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती. त्यानंतर ८३मधील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतील उतरली होती.