छोट्या पडद्यावरील 'लाफ्टर क्वीन' म्हणून भारती सिंग ओळखली जाते. तिने विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 'लल्ली' या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे. भारती एक स्टँडअप कॉमेडियन असण्यासोबतच उत्तम रिअॅलिटी शो होस्ट देखील असल्याचे पाहायला मिळते. लोकप्रियतेच्या बाबतीत, ती अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी स्पर्धा करते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज-३'द्वारे टीव्हीच्या दुनियेत पदार्पण करणाऱ्या ‘लल्ली’चे म्हणजेच भारती सिंहचे आयुष्य खूप खडतर होते. पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या भारतीचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. आज ३ जुलै रोजी भारती सिंहचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी....
भारतीचा जन्म अमृतरसरमधील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पण एक वेळ अशी आली होती की भारतीच्या कुटुंबाकडे दोन वेळच्या अन्नासाठी पैसे नव्हते. तिचे कुटुंब गरिबीशी झुंजत होते. बालपणी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. भारती अवघ्या २ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर केवळ तिच्या आईनेच कुटुंबासाठी कष्ट केले. वडिलांच्या मृत्यूनंतर डोक्यावरील कर्ज वाढले होते. त्यामुळे लोक येऊन तिच्या आईला शिवीगाळ करायचे. कर्ज फेडण्यास सांगायचे. कधी त्यांच्या घरात खायला देखील काही नसायचे. अशावेळी ती केवळ मीठ-भाकरी खाऊन आपली भूक शमवायची.
वाचा: गेली ४० वर्षे रजनीकांतसोबत का काम केले नाही? कमल हासन यांनी सांगितले कारण
भारती सिंहच्या कॉमेडी करिअरची सुरुवात २००८ साली 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज-३' या प्रसिद्ध शोने झाली. या शोमध्ये भारतीच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती ‘लल्ली’ची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झाली. भारती सिंह आज तिच्या कॉमिक टायमिंग आणि जोक्ससाठी लोकांमध्ये ओळखली जाते. भारती सिंहने ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’, ‘कहानी कॉमेडी सर्कस की’, ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ यांसारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे. कॉमेडियन असण्यासोबतच ती एक उत्तम अभिनेत्री आणि नर्तकही आहे. ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमध्येही ती दिसली आहे.
वाचा: मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट, वेधले सर्वांचे लक्ष
कधीकाळी दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणारी भारती आज आपल्या मेहनतीने एका मोठ्या स्थानावर पोहोचली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती सिंहची एकूण संपत्ती २२ कोटी रुपये आहे. ती एका एपिसोडसाठी ७ ते ८ लाख रुपये मानधन घेते. त्यानुसार भारती एका महिन्यात जवळपास ३०-३५ लाख रुपये कमावते. खडतर आयुष्य पाहिलेली भारती आता अतिशय विलासी जीवन जगते. मुंबईत तिचे स्वतःचे आलिशान घर आहे. सोबतच तिच्याकडे अनेक महागड्या लक्झरी गाड्या देखील आहेत.
वाचा: प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये
संबंधित बातम्या