छोट्या पडद्यावरील म्यूजिकल शो 'अंताक्षरी' सर्वांच्या आजही लक्षात आहे. हा शो अभिनेते अन्नू कपूर यांनी होस्ट केला आहे. आजही अंताक्षरीचे नाव घेतले की अन्नू कपूरचा चेहरा सर्वांच्या समोर उभा राहातो. त्यांनी ‘काला पत्थर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. काला पत्थप या पहिल्यावहिल्या चित्रपटातून अन्नू कपूरने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी ‘बेताब’, ‘मंडी’, ‘आधारशिला’ आणि ‘खंडर”मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘घायल’, ‘हम’, ‘डर’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. आज २० फेब्रुवारी रोजी अन्नू कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी....
स्मिता पाटील आणि अन्नू कपूरची मैत्री
सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील आणि अन्नू कपूर यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते होते. १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता पाटील यांचे निधन झाले. वयाच्या ३१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. अन्नू कपूर यांनी स्मिताला निधनाच्या काही महिन्यांपूर्वी जपून राहण्याचा सल्ला दिला होता.
सांगितले होते स्मिताचे भविष्य
‘सुहाना सफर विथ अनु कपूर’ या कार्यक्रमात अन्नू कपूर यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला होता. “२२ जानेवारी १९८६ रोजी मी आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील एका प्रोजेक्टमध्ये काम करत होतो. सत्यजित रे यांची एक मालिका असायची. त्यात स्मिता पाटील यांच्या पतीच्या भूमिकेत मी होतो. आम्ही दोघांनी तिथे तीन दिवस शूटिंग केले होते. २६ जानेवारी १९८६ रोजी कोलकात्याहून मुंबईला परतत असताना आम्ही दोघे बसलो होतो. त्या दिवसांत मला हस्तरेषाशास्त्राची थोडी आवड होती. स्मिता मला म्हणाली की अन्नू, तू माझा हात पाहू नकोस. मी तरीही तिचा हात पाहू लागलो आणि तिला म्हणालो की कोणतीही भाग्यरेषा जीवनरेषा साथ देत नाहीये. तसेच जीवनरेखाही पुढे सरकत नाहीये” असे अन्नू कपूर म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “स्मित, हे वर्ष तुझ्याठी थोडे कठीण आहे, तू जरा जपूर राहा." त्यानंतर काही महिन्यांमध्येच स्मिता पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता.
संबंधित बातम्या