मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Angad Bedi: अंगद बेदीने नोरा फतेहीसह तब्बल ७५ जणींना केलं डेट, ‘या’ अभिनेत्रीशी गुपचूप उरकलं लग्न

Angad Bedi: अंगद बेदीने नोरा फतेहीसह तब्बल ७५ जणींना केलं डेट, ‘या’ अभिनेत्रीशी गुपचूप उरकलं लग्न

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 06, 2024 09:10 AM IST

Angad Bedi Birthday: आज ६ फेब्रुवारी रोजी अंगद बेदीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

Angad Bedi affairs
Angad Bedi affairs

Angad Bedi-Nora Fatehi Affair: कायमच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे अंगद बेदी. अंगदने आजवर जवळपास ७५ जणींना डेट केले आहे. त्यामध्ये अभिनेत्री, डान्स नोरा फतेहीचा देखील समावेश आहे. एक काळ असा होता की दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी धुमाकूळ घातला होता. आज ६ फेब्रुवारी रोजी अंगद बेदीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

कधीकाळी बॉलिवूड कॉरीडॉरमध्ये अंगद आणि नोराच्या नात्याची जोरदार चर्चा होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे म्हटले जात होते. मात्र, अचानक एक दिवशी अंगद बेदीने बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता. यानंतर नोराला देखील मोठा धक्का बसला होता. केवळ नोराच नव्हे तर, अंगद बेदीने या आधी तब्बल ७५ जणींना डेट केले होते.
वाचा: "पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच", आतिफ अस्लमच्या बॉलिवूड पदार्पणावर मनसेची भूमिका

अभिनेता होण्याआधी आहे क्रिकेटपटू
बॉलिवूड अभिनेता असण्यासोबतच अंगद बेदी एक क्रिकेटर देखील आहे. त्याने रणजी ट्रॉफी आणि अंदर १९ सामने देखील खेळले आहेत. ‘फालतू’ या चित्रपटातून अंगद बेदीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले होते. यानंतर अंगद दिल्लीतून मुंबईत येऊन स्थायिक झाला. दरम्यान त्याच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या. एक दोन नव्हे तर, तब्बल ७५ जणींना त्याने डेट केले. यात नोरा फतेहीचा देखील समावेश होता.

मात्र, एक दिवशी अचानक अंगद बेदी याने बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाशी लग्न करत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. एका मुलाखतीत स्वतः अंगद बेदीने याचा खुलासा केला होता की, त्याने नेहाशी लग्न करण्यापूर्वी ७५ जणींना डेट केले होते. अंगदने स्वतःपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना देखील डेट केले होते. तर, नोरा फतेही आणि अंगद यांचे नाते देखील सर्वश्रुत होते. मात्र, दोघांनीही कधी याची मीडियासमोर कबुली दिली नव्हती. तरी देखील दोघेही नेहमीच एकत्र स्पॉट व्हायचे.

दरम्यान अनेक मुलाखतींमध्ये नोरा आणि अंगद यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले होते. दोघेही नेहमीच एकमेकांबद्दल बोलताना दिसायचे. मात्र, जेव्हा नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा चाहत्यांसह नोराला देखील मोठा धक्का बसला होता. अंगद आणि नेहाच्या लग्नादरम्यान नेहा आधीच गर्भवती होती. दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर मात्र, नोराने अंगदला ओळखण्यास देखील नकार दिला. कधीकाळी एकमेकांचे कौतुक करणारे नोरा आणि अंगद एकमेकांपासून कायमचे दुरावले.

WhatsApp channel

विभाग