मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  स्वतःच्याच वाढदिवसाचा केक कापत नाही अजय देवगण; तुम्ही ऐकलंत का कारण?

स्वतःच्याच वाढदिवसाचा केक कापत नाही अजय देवगण; तुम्ही ऐकलंत का कारण?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 02, 2024 07:49 AM IST

अजय देवगण याला पार्ट्यांमध्ये जाणे आवडत नाही. इतकंच नाही, तर तो त्याच्या वाढदिवसाला स्वतः केकही कापत नाही.

स्वतःच्याच वाढदिवसाचा केक कापत नाही अजय देवगण; तुम्ही ऐकलंत का कारण?
स्वतःच्याच वाढदिवसाचा केक कापत नाही अजय देवगण; तुम्ही ऐकलंत का कारण?

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हे चित्रपटसृष्टीतील एक असे नाव बनले आहे, ज्याने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे तो २ दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. अजय देवगण आज (२ एप्रिल) त्याचा ५५वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक त्याच्या चित्रपटांना चांगलीच गर्दी करतात. अजय देवगणने गंभीर भूमिकांपासून ते ॲक्शन आणि कॉमेडीपर्यंत सगळ्याच पात्रांमध्ये अक्षरशः प्राण फुंकले आहेत. आणि म्हणूनच अजय देवगण याला दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

अभिनेता अजय देवगण हा मूळचा पंजाबच्या अमृतसरचा आहे. त्याचे वडील वीरू देवगण चित्रपटसृष्टीतील स्टंट कोरिओग्राफर आणि ॲक्शन डायरेक्टर असल्याने, अजयचे बालपण मुंबईतच गेले. त्याने सिल्व्हर बीच हायस्कूल, जुहू येथून आपले शालेय शिक्षण घेतले आणि नंतर मिठीबाई महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. अजय देवगणचे संपूर्ण कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित आहे. त्याची आई वीणा देवगण या एक चित्रपट निर्मात्या आहेर आणि त्याचा भाऊ अनिल देवगण चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक आहे. अभिनयासोबतच अजय स्वतः निर्माताही बनला आहे.

नाटकासाठी पडदा उघडला अन् झुरळांनी धुमाकूळ घातला! अतुल परचुरेंचा भन्नाट किस्सा ऐकलात का?

पार्टी करणं आवडत नाही!

अजय देवगणची पत्नी काजोल देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याशिवाय त्याच्या सासरचे सदस्यही चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. अजयच्या सासूबाईही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. वयाच्या २२व्या वर्षी अजय देवगण याने ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कुकू कोहली दिग्दर्शित या चित्रपटातील कामासाठी अजयला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ३० वर्षांनंतर आजही तो हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सपैकी एक आहे. अजय चित्रपटातील कलाकारांच्या पार्ट्यांमध्ये क्वचितच दिसतो, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे साधे सरळ आयुष्य जगण्याची पद्धत... त्याला पार्ट्यांमध्ये जाणे आवडत नाही. इतकंच नाही, तर तो त्याच्या वाढदिवसाला स्वतः केकही कापत नाही.

‘लग्नाच्या पंगतीतून उठायला सांगितलं...’; जुई गडकरीच्या आयुष्यातील हा किस्सा तुम्ही ऐकलात का?

केकही कापत नाही!

याबद्दल बोलताना अजय देवगणने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी बर्थडे पर्सन नाही. मी खूप लाजाळू व्यक्ती आहे किंवा तुम्ही मला अतिशय खाजगी व्यक्ती म्हणू शकता. मी वाढदिवसाचा केकही कापत नाही. ऑफिस आणि शूटिंगच्या वेळी माझ्या घरी केक कापला जात असला, तरी मी तो सहसा माझ्या मुलांकडून किंवा माझ्या पुतण्यांकडून कापून घेतो. मला बर्थडे केक कापणंही अजिबात आवडत नाही.

WhatsApp channel

विभाग