Happy Birthday Tabu : बॉलिवूडची प्रतिभावान अभिनेत्री म्हणून तबू ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तबूचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. वयाची ५०शी ओलांडल्यानंतरही तबू सिंगल आहे. तिने आजवर लग्न केलेले नाही. आज ४ नोव्हेंबर रोजी तबूचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
काय आहे तबूचे खरे नाव ?
तबू उर्फ तबस्सुम हाश्मीचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ रोजी हैदराबादमध्ये झाला. तबूचे पूर्ण नाव तबस्सुम हाश्मी आहे. तब्बूने १९८० मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. 'कुली नंबर १' या तेलगू चित्रपटातून तिने पहिल्यांदा डेब्यू केला होता. बॉलिवूडमध्ये तबूने सर्वप्रथम बोनी कपूर यांचा 'प्रेम' हा चित्रपट साइन केला होता, पण हा चित्रपट बनवण्यासाठी ८ वर्षे लागल्याने तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता 'पहला पहला प्यार'. तब्बू तिच्या लग्नाबद्दल फारशी भाष्य करत नसली तरी एकदा तिने लग्नाबद्दल खुलासा केला होता. ती म्हणाली, 'अजयने माझ्या चुलत भावासोबत मला प्रपोज करणाऱ्या सर्व मुलांना धडा शिकवला नसता तर कदाचित आज माझं घर सेटल झालं असतं.'
कोणत्या अभिनेत्याने केला पाठलाग ?
तबूने एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर भाष्य केले होते. तब्बू म्हणाली होती, 'अजय माझ्याबाबतीत इतका प्रोटेक्टिव्ह होता की जेव्हा मी एका मुलाशी बोलले तेव्हा त्याला वाटले की तो मला चिडवत आहे. तो माझ्या चुलत भावासोबत माझी हेरगिरी करायचा. त्यांनी दोघांनी अनेकदा माझा पाठलाग केला. त्यामुळे त्यांनी मला कधीच पुढे जाऊ दिलं नाही. मात्र, लग्न न करण्याच्या निर्णयामुळे ती खूप खूश आहे आणि स्वत:च्या पद्धतीने आयुष्य जगत आहे.'
वाचा: 'दृष्ट लागण्या जोगे सारे' गाण्यातील अभिनेत्रीला खरोखरच लागली दृष्ट? अगदी कमी वयात घेतला जगाचा निरोप
तबूचे आहेत काही मोजकेच मित्र-मैत्रिण
इंडस्ट्रीतील अनेक लोकांशी मैत्री नसल्याबद्दल तबूने मुलाखतीमध्ये वक्तव्य केले. तबू म्हणाली होती की, ' माझी मैत्री नाही असं नाही. होय, फारशी मैत्री नाही. याशिवाय शाहरुख, रोहित आणि इतर अनेकांशी माझी चांगली मैत्री आहे. लोक मला त्यांच्या पार्ट्यांमध्ये बघत नाहीत, त्यामुळे त्यांना वाटतं की माझा कोणी मित्र नाही, ही वेगळी गोष्ट आहे.'