बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या शाही कुटुंबातून आल्या आहेत. त्यामधील एक नाव म्हणजे आदिती राव हैदरी. तिने सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज अदितीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अदितीने आजवर काही मोजक्याच सिनेमांमध्ये काम केले आहे. पण तिचा प्रत्येक चित्रपट हिट होताना दिसत आहे. आज २८ ऑक्टोबर रोजी आदितीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
आदितीचा जन्म २८ ऑक्टोबर १९८६ साली हैदराबादमध्ये झाले. तिचे वडील बोहरा मुस्लीम तर तिची आई हिंदू आहे. अदिती मोहम्मद सालेह अकबर हैदरी आणि जे रामेश्वर राव या शाही कुटुंबांची सदस्य आहे. आदितीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे तिने भरतनाट्यममध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या ११व्या वर्षीच आदितीने डान्स करण्यास सुरुवात केली होती. तिने भरतनाट्यमसाठी अनेकदा परदेशात प्रवास केला. तिच्या मनोरंजन विश्वात अनेक ओळखी झाल्या होत्या. तिला सुरुवातीला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.
आदितीने २००४ मध्ये ‘श्रीनगरम’मध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता. त्यात तिने १९ व्या शतकातील देवदासीची भूमिका साकारली होती. या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आदितीचा पहिलावहिला चित्रपटच हिट ठरला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने अदिती राव हैदरीला बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांत काम केले.
वाचा: 'या' भाजपच्या महिला खासदाराने साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका
‘धोबी घाट’, ‘ये साली जिंदगी’, ‘रॉक स्टार’, ‘लंदन, पेरिस, न्यूयॉर्क’, ‘मर्डर 3’, ‘वजीर’, ‘फितूर’, ‘पद्मावत’ या चित्रपटातील आदितीच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. आदिती वयाच्या १७व्या वर्षी वकील सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडली होती. तिने वयाच्या २१व्या वर्षी लग्न केले होते. पण सतत वाद होत असल्यामुळे त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. वयाच्या २५व्या वर्षी आदितीने सत्यदीपला घटस्फोट दिला. मात्र, जेव्हा आदिती बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिने लग्न आणि घटस्फोटाची बातमी सर्वांपासून लपवली होती. आता तिने सिद्धार्थशी लग्न केले आहे.
संबंधित बातम्या