मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Neena Gupta: नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली? वाचा लव्हस्टोरी

Neena Gupta: नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली? वाचा लव्हस्टोरी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 04, 2024 07:43 AM IST

Neena Gupta Birthday: अभिनेत्री नीना गुप्ता यांचा आज ४ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी. नीना गुप्ता आणि व्हीव रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली माहिती आहे का?

Neena Gupta-Vivian Richards love story
Neena Gupta-Vivian Richards love story

आपल्या दमदार अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील कायमच चर्चेत असणारी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. आज ४ जुलै रोजी नीना गुप्ता यांचा वाढदिवस आहे. दिल्लीत जन्मलेल्या नीना गुप्ता या त्यांच्या ६६ वा वाढदिवस कुठे आणि कसा साजरा करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच नीना यांच्या खासगी आयुष्याविषयी देखील सर्वजण जाणून घेण्यासाठी आतुर असतात. नीना आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वाचा...

नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्सचे अफेअर

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यातील नात्याची सर्वांनाच कल्पना आहे. व्हीव्ह आधीच विवाहित असल्याने त्यांनी नीना गुप्तांसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्यावेळी नीना या गरोदर होत्या. १९८८ मध्ये त्यांनी मसाबाला जन्म दिला. मुलीला जगात आणण्याचा निर्णय नीना यांचा होता. मसाबाला नीना यांनी एकटीनेच वाढवले. नीना-आणि व्हीव यांचे हे अफेअर काही साधेसुधे अफेअर नव्हते. नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या प्रेमप्रकरणाने त्यावेळी संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. नीना आणि व्हीव यांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला पण या प्रेमाला कधीच अधिकृत मान्यता मिळू शकली नाही.
वाचा: शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात का दाखल व्हावं लागलं?; त्यांनी स्वत:च दिली माहिती

व्हीव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची भेट

व्हीव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची पहिली भेट जयपूरमध्ये झाली होती. त्यावेळी नीना विनोद खन्नासोबत एका चित्रपटासाठी शूटिंग करत होत्या. दरम्यान, जयपूरच्या महाराणींनी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. व्हीव रिचर्ड्सही तिथे त्यांच्या वेस्ट इंडिज संघासोबत उपस्थित होते. तिथे त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू ते रिलेशनशीपमध्ये आले.
वाचा: हनीमूनला गेलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचे झाले भांडण, समोर आला व्हिडीओ

ट्रेंडिंग न्यूज

व्हीव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांना मसाबा नावाची एक मुलगी आहे. ती प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने काही दिवसांपूर्वीच दुसरे लग्न केले. आता मसाबा प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. ती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.
वाचा: कधीकाळी दोन वेळचे अन्नही मिळत नसणाऱ्या भारती सिंहकडे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती

WhatsApp channel
विभाग