रुपेरी पडद्यावरची ग्लॅमरस आई म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत. आज २१ जून रोजी रिमा लागू यांची जयंती. ७० ते ८० चा काळ रिमा लागू यांनी गाजवला होता. त्यांनी हिंदी आणि मराठी या दोन्ही चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. खरंतर रिमा यांना अभिनयाचा वारसा हा त्यांच्या आईकडूनच मिळाला होता. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
रिमा यांचे खरे नाव नयन भडभडे होते. त्यांची आई मंदाकिनी भडभडे एक अभिनेत्री होती. पुण्यातील शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून रिमा यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी चित्रपट.
वाचा: शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग
रिमा लागू यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर विविध धाटणीच्या भूमिकांना त्यांनी न्याय दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यातही त्यांनी साकारलेली ‘आई’ म्हणजे ममता आणि वात्सल्याचं प्रतिकच जणू. मुख्य म्हणजे अभिनेता सलमान खानच्या आईच्या भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. तसं पाहायला गेलं तर सलमान आणि रिमाताईंच्या वयात फारसं अंतर नाही. पण, त्यांच्या चेहऱ्यावर असणारी मातृत्वाची झाक काही औरच होती. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्या वेळी त्यांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास होते. अशात सलमानची आई साकारणे तसे आव्हानच होते. सलमान- रिमा यांची आई-मुलाची जोडी इतकी हिट ठरली होती की सर्वजण रिमा लागूला सलमानची आई समजू लागले होते.
वाचा: 'सोनाक्षी आणि जहीरची मुले होऊ द्या', स्वरा भास्करने दोघांच्या धर्मावरुन मांडले स्पष्ट मत
‘मैने प्यार किया’, ‘पत्थर के फूल’, ‘साजन’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांमध्ये रिमा यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. मुलांच्या कलाने घेणारी, त्यांची गुपितं समजणारी, प्रेमामध्ये साथ देणारी आणि वेळ पडल्यास रागे भरणारी आई रिमा यांनी रुपेरी पडद्यावर साकारली. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण, संजय दत्त, राहुल रॉय, गोविंदा ते अगदी जुही चावला, काजोल यांच्या आईच्या भूमिकेतही रिमा ठळकपणे लक्षात राहिल्या.
वाचा: शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा