बॉलिवूड कलाकारांच्या मुलांना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. त्यांच्या मुलांचे क्यूट फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. नुकताच आलिया भट्टने राहासोबत फोटो काढले आणि स्वरा भास्करने राबिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री बिपाशा बासूने लेकीचा फोटा शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
बिपाशाने मुलगी देवीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये देवीचे साइड फेस दिसत आहे. तसेच देवीने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यावर लाल रंगाचा हेअरबँड घातला आहे. या लूकमध्ये देवी अतिशय क्यूट दिसत आहे. हा फोटो शेअर करत बिपाशाने "यंदा ख्रिसमससाठी सांताकडे हा एक नवीन मदतनीस आला आहे. जो त्याच्यासोबत आनंद आणि प्रेमाची भेट घेऊन आला आहे" असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: निळू फुलेंचा सुपरहिट ‘भिंगरी’ सिनेमा घरबसल्या पाहा! जाणून घ्या कुठे आणि कधी?
देवीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी देवीच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने 'पप्पाची कार्बन कॉपी आहे' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'बार्बी डॉल' असे म्हटले आहे.
बिपाशाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती गेल्या काही दिवसांपूर्वी लाइमलाइटपासून लांब आहे. तिने धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिपाशाने अभिनेता करणशी २०१६मध्ये लग्न केले. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०२२ रोजी देवीला जन्म दिला.