बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर, आता बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर हे आई-बाबा झाले आहेत. बिपाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. वयाच्या ४३व्या वर्षी बिपाशा आई झाल्यामुळे तिला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता बिपाशा मुलीचे नाव काय ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष होते. बिपाशाने मुलीचे नाव काय ठेवले हे आता समोर आले आहे.
बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी मुलीचे पाय हातात घेतले आहेत. हा फोटो शेअर करत त्याने, '१२.११.२२, देवी बसू सिंह ग्रोवर' असे त्या फोटोवर लिहिले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
वाचा: 'द कश्मीर फाईल्स'नंतर विवेक अग्निहोत्रीचा नवा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेत्री बिपाशा बसूने ऑगस्टमध्ये तिची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून ही जोडी सोशल मीडियावर अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर करत होती. बिपाशाने अनेक मॅटर्निटी फोटोशूटही केले आहेत. तिने तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित काही व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'अलोन' चित्रपटाच्या वेळी करण आणि बिपाशाची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रिचे नाते निर्माण झाले. हळूहळू मैत्रिचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निणर्य घेतला. करणचे हे तिसरे लग्न होते. यापूर्वी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केले होते. आता लग्नाच्या जवळपास सहा वर्षांनंतर त्यांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना एक मुलगी असून तिचे नाव देवी ठेवले आहे.