राधिका मदान इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात दिसली होती. चित्रपटाचा शेवटचा सीन शूट करताना इरफानची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. राधिकाने एका मुलाखतीदरम्यान त्या काळाची आठवण सांगितली. 'बिग बॉस मराठी' सीझन ५ या पर्वाचे विजेतेपद जिंकल्यानंतर सूरज हा घरी परतला आहे. बारामतीत सूरजच्या हस्ते मोडवे गावात 'राजा राणी' चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण करण्यात आले. या ट्रेलरमधील सूरजचा लूक पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
सत्य घटनेवर आधारित उलगडणार्या 'राजा राणी' या प्रेम कथेत सूरज महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या २ मिनिटे ४३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये जिवापाड प्रेम करणारे दोन जिवलग कायम एकत्र पाहायला मिळाले. मात्र त्या दोघांमध्ये असं काय होतं ज्याने त्यांच्या नात्यात दुरावा येतो?. बरं हा दुरावा संपलेला पाहायला मिळणार की एकमेकांचा जीव घेणार हे सारं पाहणं रंजक ठरणार असल्याचे दिसत आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या प्रेम कहाणीचा शेवट नक्की कसा असणार याची उत्सुकता आता साऱ्यांमध्येच लागून राहिली आहे. प्रियकर आणि प्रेयसीचा गावरान तडका असलेला रोमँटिक अंदाजही लक्षवेधी ठरत आहे. नायक नायिकेच्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी सूरज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतोय. ट्रेलरमध्येही त्याचा गोलीगत पॅटर्न पाहणं रंजक ठरतंय. सूरजच्या या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
'राजा राणी' या चित्रपटात 'बिग बॉस मराठी' फेम गोलीगत सूरज चव्हाण हा रोहनच्या मित्राच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. 'राजा राणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
वाचा: सख्ख्या आईला धान्य द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार? काय होते कारण वाचा
बऱ्याच दिवसांपासून 'राजा राणी' या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. या चित्रपटात सूरज चव्हाण महत्त्वाचा भूमिकेत दिसणार आहे. छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने झगमगाटीच्या दुनियेत प्रवेश करत उत्तम यश मिळवले. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता सूरज येत्या १८ ऑक्टोबर पासून मोठा पडदा गाजवायलाही सज्ज होणार आहे.
संबंधित बातम्या