Bigg Boss OTT 3 Start Date and Time: बिग बॉसचा प्रत्येक सीझन वादग्रस्त असला तरी तो टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. बिग बॉसचा एक सीझन संपताच प्रेक्षक लगेच पुढच्या सीझनची वाट पाहायला सुरुवात करतात. एल्विश यादव हा बिग बॉस ओटीटी २ चा विजेता ठरला होता. आता लवकरच निर्माते बिग बॉस ओटीटी ३ आणणार आहेत. त्याच्या प्रीमियरची तारीखही समोर आली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
बिग बॉस ओटीटी ३ चा प्रीमियर मे महिन्यापासून होईल, असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉग ओटीटी ३ ला येत्या १५ मे २०२४ पासून सुरुवात होईल. या शोबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. शोमध्ये सहभागी होण्यासाठी निर्माते सध्या नामवंत सेलिब्रिटींसोबत फीबाबत चर्चा करत असल्याचे समजत आहे.
दलजीत कौर, शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे यांना बिग बॉस ओटीटी ३ साठी संपर्क साधण्यात आला आहे. शहजादा आणि प्रतीक्षा यांना काही दिवसांपूर्वी 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून बाहेर काढण्यात आले होते. त्यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप आहे.
टेलीचक्करच्या वृत्तानुसार, अभिनेत्री सना सईदलाही या शोमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. तिने होकार दिला आहे. आता फक्त निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. सनाने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. तिने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी अंजलीची भूमिका साकारली होती.
यूट्युबर एल्विश यादवने बिग बॉस ओटीटी २ ची ट्रॉफी आणि २५ लाखांचे बक्षीस जिंकले. त्यावेळी अभिषेक मल्हान फर्स्ट रनर अप आणि मनिषा राणी सेकंड रनर अप ठरली. एल्विश यादवने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली होती. बिग बॉसच्या इतिहासात वाइल्ड कार्ड स्पर्धकाने शो जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. एल्विश यादवने आपली ट्रॉफी अभिषेक मल्हान आणि मनीषा राणी यांना समर्पित केली होती.
संबंधित बातम्या