'बिग बॉस'च्या चाहत्यांसाठी एक मोठं अपडेट समोर आलं आहे. 'बिग बॉस ओटीटी ४' रद्द करण्यात आलेला नाही, असं म्हटलं जात आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या चौथ्या सीझनचा प्रीमियर जिओ हॉटस्टारवर होणार आहे. इतकंच नाही तर शो सुरू होण्याची संभाव्य तारीख आणि होस्टचं नावही समोर आलं आहे.
'बिग बॉस'ची बातमी देणाऱ्या 'बिग बॉस तक' या सोशल मीडिया पेजने एक्सवर एक पोस्ट शेअर करत ऑगस्टमध्ये 'बिग बॉस ओटीटी ४' सुरू होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. 'बिग बॉस ओटीटी सीझन ४'चा प्रीमियर जिओहॉटस्टारवर होणार आहे. याचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते सुरू होण्याची शक्यता आहे. "
काही दिवसांपूर्वी गॉसिप टीव्हीने सोशल मीडियावर पोस्ट केली होती की, यावेळी 'बिग बॉस १९' पाच महिने चालणार आहे. ३० जुलैपासून सुरू होणारी ही स्पर्धा जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. इतकंच नाही तर 'बिग बॉस ओटीटी' निलंबित झाल्याचा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.
जर 'बिग बॉस १९' ३० जुलैपासून सुरू झाला तर 'बिग बॉस ओटीटी ४' ऑगस्टमध्ये सुरू होणार नाही. त्यामुळे 'बिग बॉस १९' आणि 'बिग बॉस ओटीटी ४' यांच्यात कोणता शो येणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
संबंधित बातम्या