गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला बिग बॉस ओटीटीचा सिझन ३चा विजेता अखेर समोर आला आहे. नेझी आणि रणवीर शौरीला टक्कर देत सना मकबुलने बिग बॉसचा ताज स्वत:च्या नावे केला आहे. सना विजेती होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सना सुरुवातीपासूनच आपल्या खेळाने चाहत्यांना प्रभावित करताना दिसत होती. सनाने आपला खेळ मोकळेपणाने खेळला आहे. सनाने बिग बॉस ओटीटी ३ विजेत्याची ट्रॉफी जिंकली. तर नेजी फर्स्ट रनरअप आणि रणवीर शौरी सेकंड रनरअप ठरले आहे. आता सनाला बक्षिस काय मिळाले? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
अखेर अनिल कपूरयांनी सना आणि नेझीला स्टेजवर बोलावले. दोघांनाही स्टेजवर पाहून कुटुंबातील सर्व सदस्यांचे चेहरे आनंदाने फुलले. यानंतर अनिल कपूर यांनी दोघांचा हात धरून विजेत्याच्या नावाची घोषणा केली. अनिलने सनाचे नाव घेताच तिचा विश्वास बसत नव्हता की ती विजेते पदाची ट्रॉफी जिंकली आहे. सना विजेती होताच नेजीने तिला मिठी मारली आणि तिचे अभिनंदन केले. सना या सीझनची विजेती ठरली तर नेजी बिग बॉस ओटीटी 3 ची फर्स्ट रनरअप ठरली.
ट्रॉफी न जिंकल्यामुळे रणवीरला घराबाहेर पडावे लागले. पण रणवीर शौरीला मोठा धक्का बसला.आपला प्रवास टॉप 3 मध्ये संपेल असं रणवीरला वाटलं नव्हतं. रणवीर बाद होताच दीपक चौरसियाच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने अनिलला सांगितले की सर मला खूप वाईट वाटले की माझा भाऊ बाहेर आहे. त्याने हा शो जिंकावा अशी माझी मनापासून इच्छा होता.
मागच्या वेळी 'बिग बॉस ओटीटी'च्या विजेत्याला २५ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे यंदाही विजेत्याला केवळ २५ लाख रुपये मिळाले. रणवीर शौरीला बिग बॉसच्या ट्रॉफीची पर्वा नव्हती त्याला केवळ मुलाच्या सोबत राहण्यासाठी २५ लाख रुपये हवे होते.
वाचा: 'आगाऊ नको, डांबरट नको…', छोट्या पुढारीने घेतली निक्की तांबोळीची फिरकी
या शोमध्ये 16 स्पर्धकांनी प्रवेश केला होता. या यादीत सना मकबूल, साई केतन, नेझी, रणवीर शौरी आणि कृतिका मलिक, लवकेश कटारिया, अरमान मलिक, विशाल पांडे, शिवानी कुमारी, नीरज गोयत, पायल मलिक, मुनीषा खटवानी, चंद्रिका दीक्षित, पाउलोमी दास, दीपक चौरसिया, सना सुलतान यांचा समावेश होता.