'बिग बॉस ओटीटी ३'चा ग्रँड फिनाले आज म्हणजेच २ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. शोच्या फिनालेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ग्रँड फिनालेमध्ये सना मकबूल, सई केतन, नेझी, रणवीर शौरी आणि कृतिका मलिक या पाच स्पर्धकांनी स्थान पटकावले आहे. पण आता फिनालेपूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. दोन तगडे स्पर्धक शोमधून बाहेर पडले आहेत. त्यांची नावे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
'बिग बॉस ओटीटी ३'च्या ग्रँड फिनालेपूर्वीच संपूर्ण खेळ चव्हाट्यावर आला आहे. शोच्या दोन स्पर्धकांना आदल्या रात्री बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बिग बॉस खबरी या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, कृतिका मलिक आणि सई केतन राव यांना शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. हे दोन्ही स्पर्धक शोमध्ये चांगली कामगिरी करत होते. रिपोर्ट्सनुसार, कृतिका देखील सोशल मीडिया व्होटिंगमध्ये सना मकबूलच्या बरोबरीने चालत होती. पण तरीही सई केतन आणि कृतिका शोमधून बाहेर पडणे हा चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.
बिग बॉस ओटीटी ३च्या ग्रँड फिनालेला आता अवघे काही तास उरले आहेत. आता घरातील तीन स्पर्धकांमध्ये मोठी टक्कर होणार आहे. या शोमध्ये १७ स्पर्धकांनी प्रवेश केला होता, त्यापैकी फक्त तीन स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. कृतिका मलिक आणि सई केतन बाहेर पडल्यानंतर सना मकबूल, नेजी आणि रणवीर शौरी फिनालेमध्ये उतरले आहेत. या तिघांमध्ये विजेत्याच्या ट्रॉफीसाठी स्पर्धा होणार आहे.
नुकतेच लुकेश कटारिया आणि अरमान मलिक बिग बॉस ओटीटी 3 च्या घरातून बाहेर पडले आहेत. यापूर्वी विशाल पांडे, शिवानी कुमारी, नीरज गोयत, पायल मलिक, मुनीषा खटवानी, चंद्रिका दीक्षित, पाउलोमी दास, दीपक चौरसिया, सना सुलतान, अदनान शेख यांना शोमधून बाहेर काढण्यात आले होते.
बिग बॉसशी संबंधीत बातमी शेअर करणाऱ्या 'द खबरी' या सोशल मीडिया पेजवर 'बिग बॉस ओटीटी-३'ची विजेती सना मकबूल असल्याचे सांगण्यात आले आहे. नेझी ही दुसऱ्या क्रमांकावर आहे तर रणवीर शौरी हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता या पेजवर देण्यात आलेली माहिती कितपत खरी ठरते हे पाहण्यासाठी चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.
मागच्या वेळी 'बिग बॉस ओटीटी'च्या विजेत्याला २५ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे यंदाही विजेत्याला केवळ २५ लाख रुपये मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. रणवीर शौरीने बिग बॉसमध्ये असेही म्हटले होते की, त्याला ट्रॉफीची पर्वा नाही, त्याला फक्त ते 25 लाख रुपये हवे आहेत जेणेकरून तो आपल्या मुलाची कॉलेजची फी भरू शकेल.
वाचा: 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा
'बिग बॉस ओटीटी-3'चा ग्रँड फिनाले पाहायचा असेल तर तुम्ही जिओ सिनेमा हे ओटीटी अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर तुम्हाला ग्रँड फिनाले सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत सगळे अपडेट्स मिळतील. आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे ती म्हणजे कोणता स्पर्धक ओटीटीची ट्रॉफी स्वत:च्या नावे करणार.
संबंधित बातम्या