Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. कुटुंबातील सदस्य घरात येऊन आठवडा झाला असून, आता लोकांमध्ये भांडणेही सुरू झाली आहेत. इतकंच नाही, तर पहिलं एलिमिनेशन ही घरात पार पडलं आहे. बॉक्सर नीरज गोयत हा घराबाहेर पडणारा पहिला सदस्य बनला आहे. आता या शोबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘जनते का एजंट’ बनून घराघरांत पोहोचलेल्या सना सुलतानला बिग बॉसने तिच्या पदावरून काढून टाकले आहे.
सना सुलतानला बिग बॉसने ‘जनते का एजंट’ या पदावरून काढून टाकले आहे. सना सुलतान ही जनतेची एजंट म्हणून प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरी उतरू शकलेली नाही, म्हणूनच तिला बिग बॉसने या पदावरून काढून टाकले आहे. सना सुलतान ही घरातील पहिली जनता एजंट होती.
‘बिग बॉस ओटीटी ३’च्या लाईव्ह फीडमध्ये बिग बॉसने सना सुलतानला काढून टाकत साई केतन रावची नवा ‘जनता का एजंट’ म्हणून निवड केल्याचे पाहायला मिळाले आहे. तो आपला फोन घेऊन बाथरूमच्या आत जातो आणि मग त्याच्या लक्षात येते की, आता तो नवा ‘जनता का एजंट’ बनला आहे. मात्र, साई केतन राव हा ‘जनता का एजंट’ असल्याचा संशय घरच्यांना येणार आहे.
'बिग बॉस तक'ने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये आता घरच्यांना साई केतन रावची ओळख कळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तो आपला फोन बाथरूममध्ये घेऊन जाईल. आणि साई केतनच्या चेहऱ्यावर भीती पाहून घरातील इतरांना साई केतन हा जनतेचा एजंट असल्याचा संशय येईल.
तर, आता या शोची आणखी एक क्लिप समोर आली आहे. यात साई केतन राव, लव कटारियाला ‘जोकर २.०’ म्हणताना दिसला आहे. अरमान मलिकसोबत झालेल्या संभाषणात तो म्हणतो की, लव एल्विशची कॉपी करत आहे.
‘जनता का एजंट’ला ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. ‘जनते का एजंट’ असलेल्या स्पर्धकाला नॉमिनेट केले तरी, तो बेघर होणार नाही. सना सुलतानकडे ती ताकद होती. मात्र, आता तिला या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. आता तिलाही घरातून बेघर होण्याचा धोका निर्माण होणार आहे.
संबंधित बातम्या