Bigg Boss OTT 3 Latest Update:'बिग बॉस ओटीटी ३'मधून अभिनेत्री आणि मॉडेल पौलोमी दासचा प्रवास आता संपला आहे. पौलोमीने या शोमध्ये आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनाही पौलमीचा खेळ खूप आवडला होता. या शोमध्ये पौलोमी दासचं अनेकांसोबत चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळालं. तर, दुसरीकडे तिचं अनेकांशी प्रचंड भांडणही झालं. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात पौलोमी दास आणि शिवानी कुमारी यांच्यात खूप तू तू मैं मैं मैं झाली होती. शोमधून बाहेर पडताच पौलोमीनं घरातील गुपितं उघड करण्यास सुरुवात केली आहे.
यादरम्यान, बिग बॉसने शोमधून कोणाला वगळून कोणाला विजेता बनवण्याचा निर्णय घेतला आहे, हे आपल्याला ठावूक असल्याचा धक्कादायक खुलासा तिने आता केला आहे.
अभिनेत्री पौलोमी दास आता बाहेर पडताच बिग बॉस आणि स्पर्धकांबद्दल आश्चर्यकारक खुलासे करत आहे. ‘द खबरी’च्या रिपोर्ट्सनुसार पौलोमी दासने मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, लव कटारियाचा मोठा चाहता वर्ग आहे, परंतु बिग बॉस त्याला परस्पर संमतीने घराबाहेर काढणार आहे आणि नेझीला विजेता ठरवणार आहे. जर, ही बातमी खरी ठरली, तर एमसी स्टॅननंतर आणखी एक रॅपर बिग बॉसची ट्रॉफी घरी घेऊन जाणार आहे. सध्या ही बातमी कितपत खरी आहे, किती चुकीची आहे, हे कळण्यासाठी फिनालेपर्यंत थांबावं लागणार आहे.
अभिनेत्री पौलोमी दासने या शोवर आणि कुटुंबावर आपला राग व्यक्त केला आहे. पौलोमीने एक्स अर्थात ट्विटरवर तिच्या घराबाहेर पडण्याचा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, 'हाहाहा, फक्त मी माझ्यावर केलेल्या कमेंट्सविरोधात आवाज उठवला म्हणून. मग त्याने मला बाहेर जाण्याचा दरवाजा दाखवला. त्यांना त्यांच्या शोमध्ये कणखर, विचारी मुली नको असतात. उलट निरक्षर लोकांनी त्यांना अधिक निकृष्ट कंटेंट द्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. तिने शिवानी कुमारीचे नाव घेतले नसले, तरी तिचा संदर्भ तिच्याकडेच असल्याचे पौलोमीच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. कारण शोमध्ये त्याचे आणि शिवानीचे जोरदार भांडण झाले होते.
संबंधित बातम्या