Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये भाग घेतल्यानंतर व्लॉगर अरमान मलिकचे वैयक्तिक आयुष्य अधिक प्रकाशझोतात आले आहे. त्याची एक पत्नी पायल शोमधून बाहेर पडली असून, प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहे. अरमान मलिकच्या दोन्ही बायका बहुतेकांनी या आधीच पाहिल्या आहेत. आता या शोमध्ये असताना त्याच्या तिसऱ्या लग्नाचाही उल्लेख करण्यात आला होता. आता पायल शोमधून बाहेर आली आहे आणि तिने अरमानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे.
यावेळी बोलताना पायल म्हणाली की, हो अरमानने तीन लग्ने केली आहेत हे खरे आहे. पायल म्हणाली की, अरमानने पहिल्या लग्नातून घटस्फोट घेतल्यानंतरच तिच्याशी लग्न केले होते. मात्र, आता अरमानच्या पहिल्या पत्नीनेही दुसरे लग्न केले आहे, असा खुलासा देखील पायलने केला आहे.
‘बिग बॉस ओटीटी ३’ सुरू झाल्यापासून प्रेक्षक अरमान मलिकच्या आयुष्याविषयी खूप चर्चा करताना दिसत आहेत. या शोमध्ये नुकतेच दुसरे एलिमिनेशन पार पडले आहे. यामध्ये अरमानची एक पत्नी पायल बेघर झाली आहे. प्रेक्षकांनाही याची अजिबात अपेक्षा नव्हती. गलाता इंडियाशी बोलताना पायलला अरमानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील प्रश्न विचारण्यात आले.
पायलने अरमानचे नाव संदीप असल्याचे सांगितले. लहान असतानाच त्याचे लग्न झाले होते. याबद्दल बोलताना पायल म्हणाली की, 'असं काही नाही, माझ्या लग्नापूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता आणि हरयाणात त्यांचा हा बालविवाह झाला होता. त्यांच्या घटस्फोटानंतरच माझं लग्न झालं. आमच्या हरयाणात १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच लग्न करतात.'
पहिल्या पत्नीविषयी बोलताना पायल म्हणाली की, ‘अरमानने पोटगीमध्ये तिला भरपूर पैसे दिले आहेत आणि आता तिने दुसरं लग्न केलं आहे. ती आता तिच्या संसारात आनंदी आहे. तिला मुलेही झाली असावीत. ती तिच्या लग्नाच्या नात्यात आनंदी आहे.’ अरमान आणि त्याच्या कुटुंबाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. लोक म्हणत आहेत की, तो बहुपत्नीत्वाला प्रोत्साहन देत आहे. मात्र, पायल बाहेर आल्यानंतर त्यावरही बोलली आहे. तिने ट्रोल करणाऱ्या लोकांना चांगलेच उत्तर दिले आहे.
संबंधित बातम्या