Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांना बसणार शॉक! कोण होणार बेघर?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांना बसणार शॉक! कोण होणार बेघर?

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांना बसणार शॉक! कोण होणार बेघर?

Updated Jun 25, 2024 03:40 PM IST

Bigg Boss OTT 3 Latest Update: नुकताच या शोमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये सना सुलतान, साई केतन, रणवीर शौरी, दीपक चौरसिया, शिवानी कुमारी आणि नीरज गोयत यांच्या नावाचा समावेश होता.

Bigg Boss OTT 3
Bigg Boss OTT 3

Bigg Boss OTT 3 Latest Update: 'बिग बॉस ओटीटी ३' सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले असून, अवघ्या ३ दिवसांतच घरातील दोन सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती टांगती तलवार लटकू लागली आहे. नुकताच या शोमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये सना सुलतान, साई केतन, रणवीर शौरी, दीपक चौरसिया, शिवानी कुमारी आणि नीरज गोयत यांच्या नावाचा समावेश होता. या टास्कदरम्यान घरातील केवळ काही सदस्यांची नावे होती. मात्र, बिग बॉसने फक्त शिवानी आणि नीरज यांनाच एलिमिनेशनसाठी नॉमिनेट केले आहे.

या ट्विस्ट घेऊन आलेल्या नॉमिनेशन टास्कनंतर बिग बॉसने शिवानी आणि नीरजसाठी व्होटिंग लाईन्स सुरू केल्या आहेत. पण, आता त्यातही ट्विस्ट आला. बिग बॉस न्यूज पेज 'बिग बॉस तक'ने दिलेल्या माहितीनुसार, २५ जून दुपारी २ वाजेपर्यंतच व्होटिंग लाईन्स सुरू ठेवण्यात येणार होत्या. 'बिग बॉस ओटीटी ३'च्या सुरुवातीलाच मेकर्स मिड वीक एविक्शन करून काही लोकांना घराबाहेर काढण्याची योजना आखत आहेत. पहिल्या आठवड्यात एलिमिनेशन होणार नाही, असं लोकांना वाटत होतं. पण, आता असं म्हटलं जात आहे की, बिग बॉस मिड वीकमध्ये शिवानी आणि नीरज पैकी एकाला एलिमिनेट करून घरातील बाकी स्पर्धकांना झटका दिला जाणार आहे.

कोण बाहेर पडणार?

शिवानीची लोकप्रियता पाहता नीरजला या सीझनमधून बेघर केले जाईल, असे लोकांना वाटते. आता असं होणार की, नाही हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, शिवानीच्या कुटुंबीयांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये ते शिवानीसाठी मतांचे आवाहन करताना दिसत आहे. तर नीरजचे चाहते सोशल मीडियावर लोकांना व्होट करण्यासाठी प्रेरित करत आहेत.

Tharala Tar Mag: प्रियाची चोरी पकडण्यात चैतन्य आणि अर्जुनला मिळणार का यश? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

बिग बॉसच्या घरात रेशन नाही!

सध्या ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरामध्ये जेवणासाठी लढाई सुरू झाली आहे. नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये घरातील सर्वजण पाणी पिताना दिसले होते. काहीतरी खायला हवं, असं म्हणत सगळेच राग व्यक्त करत होते. यावर प्रत्येकजण आपापले लॉजिक लावत होते. दरम्यान, शिवानी कुमारीने माती खायला सुरुवात केली.

शिवानी माती खाताना पाहून सगळे तिला प्रश्न करतात. यावर शिवानी म्हणते की, ‘ही माती मी माझ्या गावाहून आणली आहे.’ यावर घरातील लोक तिची खिल्ली उडवतात, तेव्हा शिवानी म्हणते की तिला भूक लागली आहे.

Whats_app_banner