Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’चे घर आता रणांगण बनले आहे. एका बाजूला विशाल पांडे आणि दुसऱ्या बाजूला अरमान मलिक असे दोन स्पर्धक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. दोघांमधील जोरदार वादामुळे बिग बॉसच्या घरात तणाव तर आहेच. पण, सोशल मीडियावरही वादळ निर्माण झाले आहे. त्याच वेळी, दोघांमध्ये जोरदार वाद चालू असताना, आता या खेळत आणखी एक ट्विस्ट येताना दिसणार आहे. अभिनेता विशाल पांडे याने अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिच्याबद्दल बोलताना ‘भाभीजी खूप सुंदर दिसतात’ असे म्हटले होते. मात्र, त्याच्या या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. यामुळे घरात मोठे वाद निर्माण झाले आहेत.
विशाल पांडे होस्ट अनिल कपूर आणि इतरांच्या प्रतिक्रियेमुळे दु:खी झाला आहे. तसेच, अरमान मलिकने थेट हात उचलल्यामुळे आता विशाल पांडे याची बाजू फारच कमकुवत झाली आहे. मात्र, विशालचे काही चुकले आहे असे वाटत नसले, तरी त्याची हिंमत मात्र नक्कीच तुटली आहे. दुसरीकडे, घराचा सर्वात महत्त्वाचा नियम मोडून हिंसाचार करणारा अरमान चुकीचा असूनही स्पर्धकांच्या नजरेत योग्य ठरला आहे. पण, आता विशालचे चाहते आणखी निराश होणार आहेत. आता बिग बॉसच्या घरातील हा प्रवास विशालसाठी आणखी कठीण होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
गेल्या एपिसोडमध्ये सर्वांनी अरमान मलिकला सपोर्ट केल्याचे दिसले होते. विशालचा जिवलग मित्र लव कटारियाही घरात त्याच्या विरोधात आहे. आता अशा परिस्थितीत विशालला एकटे वाटू लागले आहे. मात्र, या घटनेनंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी विशालवर बहिष्कार टाकल्यास काय होईल, याचा विचार सगळेच करत आहेत. याचे कारण म्हणजे, जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये चंद्रिका दीक्षित शिवानी कुमारीला प्रश्न विचारताना दिसली आहे. तसेच ती विशालच्या विरोधात बोलताना दिसली आहे.
‘वडापाव गर्ल’ चंद्रिका शिवानीला विचारते की, 'विशालने जे केले ते बरोबर आहे का?' ज्याला शिवानी 'नाही', असे उत्तर देते. यानंतर चंद्रिका शिवानीला म्हणते, 'मग तू त्याच्यासोबत कशी राहतेस?' यावर ती असेही म्हणते की, ती काही शिवानीवर कोणतेही बंधन घालत नाही, फक्त तिची विवेकबुद्धी तिला शांत बसू देत नाहीये. आता चंद्रिकाचे हे वक्तव्य ऐकून असे वाटते की, विशाल घरात एकटा पडावा आणि त्याच्याशी कोणी बोलू नये, अशी तिची इच्छा आहे. आता ती तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होते की, नाही हे आगामी एपिसोडमध्येच पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या