Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’चा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यात शोच्या या आठवड्यासाठीचा नॉमिनेशन टास्क पार पडत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावेळी नॉमिनेशन टास्कमध्ये यामध्ये शोमधून ज्या स्पर्धकाला बाहेर काढायचे आहे, त्या सर्व स्पर्धकांच्या गळ्यात मेडल घालायचे आहे. या प्रोमोमध्ये पाहाल मिळाले की, बिग बॉस सगळ्यांना फोन करून म्हणतात की नॉमिनेशनमधली मेडलची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी विशाल पांडे आणि चंद्रिका यांच्यात भांडण होताना पाहायला मिळणार आहे.
नॉमिनेशन प्रक्रियेदरम्यान कृतिका शिवानीला म्हणते की, हिला फक्त इतरांच्या बाबतीत टॅन-टॅन कराचं असतं, मग तिचा विषय असो वा नसो. तर, शिवानी कृतिकाला म्हणते की, तिचा नवराच तिचे सगळे निर्णय घेतो. यानंतर दोघींमध्ये वाद होतात आणि कृतिका म्हणते की, उगाच माझ्या तोंडाला लागू नकोस.
यानंतर चंद्रिका, बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक अभिनेता विशाल पांडेला मेडल देऊन नॉमिनेट करते आणि म्हणते की, तुझ्याकडून मुलींचा सन्मान केला जात नाही. त्याचवेळी वैतागलेला विशाल तिला उत्तर देतो की, ‘तू मला एका वक्तव्यावरून असं जज करू शकत नाहीस. माझ्यासोबत वेळ घालवा आणि माझा स्वभाव बघ.’ यावर चंद्रिका म्हणते की, ‘मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता, पण तूच तो काढून घेतलास.’ यावर विशाल म्हणतो, ‘तू अशी कुणी नाहीस जिला मी सगळ्याची उत्तरं द्यायला हवी. थोडं नियंत्रणात राहा.’
‘बिग बॉस ओटीटी ३’च्या नव्याने रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये, विशालला अनेक मेडल्स देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या आधी ‘द खबरी’ने ट्विट केले होते की, या आठवड्यात लवकेश कटारिया, विशाल पांडे, चंद्रिका दीक्षित, अरमान मलिक आणि शिवानी कुमारी यांच्यापैकी एक या शोमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आता सगळ्यांच्या नजरा या आठवड्यात कोणाचा प्रवास संपणार, याकडे लागल्या आहेत.
गेल्या ‘वीकेंड का वार’नंतर अनेकांची मैत्री बदलली आहे. याआधी चंद्रिकाची विशाल आणि शिवानीसोबत चांगली मैत्री होती. पण, विशालने कृतिकाबद्दल केलेली टिप्पणी कळताच चंद्रिकाने त्याच्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.
संबंधित बातम्या