मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: पहिल्याच आठवड्यात घरातून बाहेर गेला ‘बिग बॉस ओटीटी’चा ‘हा’ स्पर्धक! काय आहे कारण?

Bigg Boss OTT 3: पहिल्याच आठवड्यात घरातून बाहेर गेला ‘बिग बॉस ओटीटी’चा ‘हा’ स्पर्धक! काय आहे कारण?

Jun 26, 2024 04:02 PM IST

Bigg Boss OTT 3 Latest Update:बिग बॉसने ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या पहिल्याच आठवड्यात मिड-वीक एविक्शन करून घरातील सदस्यांना धक्का दिला आहे.

Bigg Boss OTT 3 Latest Update
Bigg Boss OTT 3 Latest Update

Bigg Boss OTT 3 Latest Update: 'बिग बॉस ओटीटी ३' दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत आहे. पहिल्याच आठवड्यात या घरात गदारोळ पाहायला मिळाला. एकीकडे रेशनच्या कमतरतेमुळे घरातील सदस्य आपापसात भांडताना दिसले, तर दुसरीकडे बिग बॉसने पहिल्याच आठवड्यात मिड-वीक एविक्शन करून घरातील सदस्यांना धक्का दिला आहे. पहिल्या आठवड्यात, घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेशन टास्क देण्यात आले होते, ज्यामध्ये सर्व सदस्यांनी ६ लोकांना नॉमिनेट केले होते. मात्र, जनतेच्या निर्णयावरून घराबाहेर करण्यासाठी दोन नावे सुचवण्यात आली, त्यापैकी एक शिवानी कुमारी आणि दुसरे नीरज गोयत यांचे नाव पुढे आले. मीडिया रिपोर्ट्सवर, या पहिल्याच आठवड्यात नीरज गोयत बेघर झाला आहे.

शोच्या नव्या अपडेटनुसार, बिग बॉसने सर्व घरातील सदस्यांना लिव्हिंग एरियात बोलावले आणि त्यांना मिड-वीक एविक्शनची माहिती दिली. यानंतर प्रेक्षकांसाठी व्होटिंग लाईन्स उघडण्यात आल्या. शिवानी कुमारी आणि नीरज गोयत यांना बाहेर काढण्याची जबाबदारी घरातील अन्य सदस्यांवर सोपवण्यात आली होती. घरातील सदस्यांनी परस्पर संमतीने शिवानी कुमारला सुरक्षित केले आहे, तर नीरज गोयतला बेघर केले आहे. 'द खबरी'च्या अपडेटनुसार, नीरज गोयतचा ‘बिग बॉस ओटीटी ३’मधील प्रवास पहिल्याच आठवड्यात संपला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोण आहे नीरज गोयत?

‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये झळकलेला नीरज गोयत हा हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील बेगमपूर गावचा रहिवासी आहे. तो एक प्रसिद्ध बॉक्सिंग चॅम्पियन आहे, ज्याने डब्ल्यूबीसीमध्ये एशियाचे विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय नीरज सोशल मीडियावर त्याच्या बॉक्सिंगबद्दलच्या रील शेअर करत असतो, ज्यामुळे त्याची खूप फॅन फॉलोइंग आहे. इतकंच नाही, तर नीरज गोयत याने अनेक सिनेतारकांना प्रशिक्षणही दिलं आहे. म्युझिक व्हिडीओमध्येही तो दिसला आहे. त्याने अभिनेता फरहान अख्तरला एका चित्रपटासाठी बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले होते. याशिवाय नीरजने राम चरण आणि रणदीप हुड्डा यांना बॉक्सिंगचे प्रशिक्षणही दिले आहे.

निर्मात्यांच्या निर्णयावर चाहते नाराज!

‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये नीरज गोयत खूपच चर्चेत दिसला होता. गेल्या एपिसोडमध्ये, जेव्हा रेशन संपले होते आणि घरातील सर्व सदस्य बिग बॉसकडे जेवण देण्याची मागणी करत होते, तेव्हा नीरजने बिग बॉसच्या निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. ज्याप्रमाणे काही कुटुंबातील सदस्यांना सिगारेट दिली जात आहे, त्याचप्रमाणे त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू दिल्या पाहिजेत, अशी मागणी त्याने केली होती. आता नीरजला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आल्याची बातमी समोर आल्यावर चाहते निर्मात्यांवर राग काढताना दिसत आहेत.

WhatsApp channel