Bigg Boss OTT 3: सलग दुसऱ्या आठवड्यात तिसरं एलिमिनेशन; ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्पर्धकांना बसणार धक्का!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: सलग दुसऱ्या आठवड्यात तिसरं एलिमिनेशन; ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्पर्धकांना बसणार धक्का!

Bigg Boss OTT 3: सलग दुसऱ्या आठवड्यात तिसरं एलिमिनेशन; ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्पर्धकांना बसणार धक्का!

Published Jul 03, 2024 03:59 PM IST

Bigg Boss OTT 3 Latest Update: 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये मिडवीक नॉमिनेशनचा टास्क पार पडला आहे. दुसऱ्या आठवड्याच्या मध्यात कोणत्या सदस्याला या शोमधून बाहेर काढले जाणार, हे आता समोर आले आहे.

Bigg Boss OTT 3 Latest Update
Bigg Boss OTT 3 Latest Update

Bigg Boss OTT 3 Latest Update: 'बिग बॉस ओटीटी ३' आजकाल प्रेक्षकांचा आवडता शो बनला आहे. या शोमध्ये सुरू असलेल्या मजेशीर खेळामुळे लोकांची चांगलीच करमणूक होत आहे. दरम्यान, आता दुसऱ्या आठवड्याच्या मध्यात देखील घरात एलिमिनेशन पार पडणार आहे. आता घरातून कोण बाहेर जाणार, हे जाणून घेण्यासाठी लोकही खूप उत्सुक झाले आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मिड-वीक नॉमिनेशन टास्क झाला आहे. यामध्ये एकूण ६ लोकांना नॉमिनेट करण्यात आले आहे. चंद्रिका दीक्षित (वडा पाव गर्ल), मुनिषा खतानी, विशाल पांडे, शिवानी कुमारी, पौलोमी दास आणि नेझी हे स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. या ६ सदस्यांपैकी शोमधून बाहेर पडणाऱ्या सदस्याचे नाव समोर आले आहे.

यावेळी 'बिग बॉस ओटीटी ३' मधील बरेच काही नियम बदलले आहे. सलमान खानच्या जागी अनिल कपूर शोचा नवा होस्ट म्हणून आला आहे. यावेळी आठवड्यातून दोनवेळा एलिमिनेशन होताना दिसत आहे. इतकंच नाही, तर एक एलिमिनेशन आठवड्याच्या मध्यात होत आहे. तर, दुसरे एलिमिनेशन आठवड्याच्या शेवटी होत आहे. गेल्या आठवड्यात दोन सदस्यांना या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. नीरज गोयतला आठवड्याच्या मध्यात बेघर व्हावे लागले. तर, पायल मलिकला ‘वीकेंड का वार’मध्ये एलिमिनेट करण्यात आले. आता दुसऱ्या आठवड्याच्या मध्यात बेघर झालेल्या सदस्याचे नाव समोर आले आहे.

‘हा’ सदस्य झाला बेघर!

बिग बॉसशी संबंधित अपडेट्स देणाऱ्या सोशल मीडिया पेज 'द खबरी'ने आठवड्याच्या मध्यात घरातून एलिमिनेट होणाऱ्या तिसऱ्या सदस्याचे नाव जाहीर केले आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’मधील बेघर होणारी सदस्य अभिनेत्री पौलोमी दास आहे. तिचा या शोमधील प्रवास आता लवकरच संपणार आहे. लाइव्ह व्होटिंग ट्रेंडमध्ये मुनिषा खटवानी हिला सर्वात कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे असे म्हटले जात होते की, मुनिषा मिडवीक एलिमिनेशनमध्ये बाहेर जाऊ शकते. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आठवड्यात मुनिषा नाही तर पौलोमीला घरातून बाहेर काढले जाणार आहे.

शिवानी कुमारीशी भांडण येणार अंगाशी?

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात पौलोमी दास आणि शिवानी कुमारी यांच्यातील भांडण खूप प्रसिद्ध आहे. दोघींची घरात अनेक भांडणे झाली आहेत. गेल्या आठवड्यात एका टास्कदरम्यान शिवानी कुमारीने धक्का दिल्याने पौलोमी जमिनीवर पडली होती. यामुळे तिला खूप दुखापत झाली होती. यानंतर पौलोमी आणि शिवानीमध्ये जोरदार भांडण झाले होते. मात्र, गेल्या एपिसोडमध्ये पौलोमीने शिवानीकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. ही मैत्री आणखी पुढे जाण्याआधीच पौलोमी घरातून बाहेर जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Whats_app_banner