Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात स्पर्धकांना बसणार पुन्हा धक्का! डबल एलिमिनेशन होणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात स्पर्धकांना बसणार पुन्हा धक्का! डबल एलिमिनेशन होणार?

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात स्पर्धकांना बसणार पुन्हा धक्का! डबल एलिमिनेशन होणार?

Jul 16, 2024 06:02 PM IST

Bigg Boss OTT 3 Latest Update: 'बिग बॉस ओटीटी ३' या शोमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. या आठवड्यात घरात दुहेरी एलिमिनेशन होणार आहे.

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात स्पर्धकांना बसणार पुन्हा धक्का!
‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात स्पर्धकांना बसणार पुन्हा धक्का!

Bigg Boss OTT 3 Latest Update:'बिग बॉस ओटीटी ३'चा फिनाले आता अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. अशातच बिग बॉस शो एकापाठोपाठ एक नवे ट्विस्ट घेऊन प्रेक्षक आणि स्पर्धकांना धक्का सज्ज झाला आहे. आधी बिग बॉसने घरातील स्पर्धकांना एक टास्क दिला होता. या टास्कनंतर बिग बॉसने घोषणा केली की, या आठवड्यात लव कटारिया, कृतिका मलिक, सना सुलतान, अरमान मलिक, नेजी, साई केतन राव आणि सना मकबूल नॉमिनेट आहेत. त्यानंतर त्यांनी सगळे नॉमिनेशन रद्द केले आणि शोचा पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक अदनान शेखला नॉमिनेट केले. त्याचबरोबर या आठवड्यात घरात दुहेरी एलिमिनेशन पार पडणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.

बिग बॉसने अदनान शेखला नॉमिनेट केलं आहे. पण, त्याच्यासाठी अद्याप व्होटिंग लाईन्स सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अदनान शेख हा वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आला असला तरी, आउटसायडर आहे. बिग बॉसच्या नियमांनुसार आउटसायडरला एलिमिनेट करता येत नाही. यामुळेच बिग बॉसने यावेळी त्याच्यासाठी व्होटिंगच्या रांगा उघडलेल्या नाहीत.

‘ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची अजिबात गरज नाही’! किरण माने यांची नवी पोस्ट चर्चेत; काय म्हणाले वाचाच...

दुहेरी एलिमिनेशन पार पडणार?

दरम्यान, बिग बॉसची बातमी देणाऱ्या 'द खबरी' या सोशल मीडिया पेजने ट्विट करत या आठवड्यात दुहेरी एलिमिनेशन पार पडणार असल्याची माहिती दिली आहे. या आठवड्याच्या मध्यात ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या एका सदस्याला काढून टाकण्यात येणार आहे आणि वीकेंड का वारमध्ये एका सदस्याला काढून टाकण्यात येणार आहे. आता हे एलिमिनेशन कसे होणार? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे.

लोकांच्या मते घराबाहेर कोण असू शकतं?

दुहेरी एलिमिनेशनची बातमी समोर आल्यानंतर एका युजरने लिहिलं, ‘सना सुलतानला वाचवण्यासाठी बिग बॉसने हा सगळा गेम खेळला आहे.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘साई केतन राव आणि दीपक चौरसिया यांना बाहेर काढले जाऊ शकते.’ तिसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘हा बिग बॉस काय करत आहे? अदनानला नॉमिनेट केलं आहे, पण तो आउटसायडर आहे, म्हणून त्याला बाहेर काढलं जाणार नाही, मग दुहेरी एलिमिनेशन कसे होणार?’ आणखी एकाने लिहिले की, ‘यावेळी कृतिका आणि दीपक बाहेर जातील.’

Whats_app_banner