Bigg Boss OTT 3 Latest Update: युट्युबर अरमान मलिक याची पत्नी पायल मलिक आता ‘बिग बॉस ओटीटी ३’मधून बाहेर पडली असली, तरी ती या शोबद्दल सतत बोलत असते. आता पायल मलिकने तिचा नवा व्लॉग शेअर केला आहे. यात तिने म्हटले की, सोशल मीडियावर तिच्याबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल येत असलेल्या ट्रोलिंग आणि नकारात्मक कमेंट्समुळे ती प्रचंड दुःखी झाली आहे. या ट्रोलिंगमुळे पायलला इतकं वाटत आहे की, तिने आपल्या मुलासोबत जाऊन आपलं आयुष्य संपवावं. अरमान आणि कृतिकाला शोमधून बाहेर काढायला हवं, असंही तिने म्हटलं आहे.
या व्हिडीओमध्ये पायल म्हणतेय की, ‘मला लोक खूप त्रास देत आहेत. गेल्या काही दिवसांत बरंच काही घडलं आहे. जे सतत ट्रोल करत आहेत, त्यांना असं वाटतं का, मी माझ्या चार मुलांसह मरून जावं? मी आजच्या इतकी अस्वस्थ कधीच झाले नव्हते.’ ती पुढे म्हणते, ‘आता मी मुलांसोबत वेळ घालवावा असा विचार करत आहे. ना मी बिग बॉस पाहत आहे, ना फोन किंवा इन्स्टाग्राम बघत आहे. कारण, सतत लोक कमेंट करून म्हणत आहेत, की मी चुकीचे केले आणि अरमानला घरातून बाहेर काढले जावे. अहो, मग त्याला काढून टाका ना… मी कधी नकार दिलाय? त्यांना बाहेर काढा, तो बाहेर येईल आणि बाळाची काळजी घेईल. मला एकटं राहून कंटाळा आलाय. अरमानला कशाला गोलूला देखील बाहेर काढा. उगाच आमच्या परिवाराला द्वेषाचा सामना करावा लागत आहे. लोक असे वागत आहेत की, जणू आम्ही सगळं काही चुकीचे केले आहे.’
पायल म्हणाली की, ‘तुम्हाला त्यांना बाहेर काढायचं असेल, तर त्यांना व्होट देऊ नका. ते आपोआप बाहेर येतील. अख्खं जग आमचा तिरस्कार करत आहे. असं वाटत आहे की, जगातील सगळ्या चुकीच्या गोष्टी आम्हीच केल्या आहेत. आम्ही आमच्या चार मुलांनाही मारलं पाहिजे, असं लोक म्हणत आहेत. आम्हाला अनेक धमक्या येत आहेत. अरमानला मारून टाकू म्हणत आहेत. अरे टाका ना आम्हाला मारून… सगळं चुकीचं आम्हीच केलंय. मला सांगा की, आम्हीच ३ लोक एकत्र राहतो का? इंडस्ट्रीत अनेकांनी २ लग्नं केली आहेत. पूर्वी लोकांचा तितकासा तिरस्कार नव्हता. सुरुवातीला सगळ्यांना ते आवडलं.'
शेवटी पायल म्हणते की, आता विशाल आणि अरमान एकमेकांशी चांगले बोलत आहेत. एकत्र पुढे जाऊन दोघांमधील तणाव दूर होईल आणि पुढे ते चांगले मित्र होतील, असे वाटत आहे.
संबंधित बातम्या