Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ‘विकेंड का वार’मध्ये पाहायला मिळणार हाय वॉल्टेज ड्रामा! पुन्हा स्पर्धक भिडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ‘विकेंड का वार’मध्ये पाहायला मिळणार हाय वॉल्टेज ड्रामा! पुन्हा स्पर्धक भिडणार?

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ‘विकेंड का वार’मध्ये पाहायला मिळणार हाय वॉल्टेज ड्रामा! पुन्हा स्पर्धक भिडणार?

Published Jul 21, 2024 08:09 AM IST

Bigg Boss OTT 3 Latest Update: आजच्या एपिसोडमध्ये 'बिग बॉस ओटीटी २'चा विजेता एल्विश यादव आणि फैजल शेख आपल्या मित्रांना पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत.

Elvish Yadav And Faisal Shaikh
Elvish Yadav And Faisal Shaikh

Bigg Boss OTT 3 Latest Update: 'बिग बॉस ओटीटी ३' हा शो आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा शो सुरू होऊन चार आठवडे झाले आहेत. या कालावधीत घरातील ६ जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावेळी ‘वीकेंड का वार’ चांगलाच धमाकेदार होता. नुकतेच देशातील सुप्रसिद्ध पत्रकार दीपक चौरसिया यांना शोमधून बाहेर काढण्यात आले आहे, जे सर्वांसाठीच धक्कादायक होते. तर, आजच्या एपिसोडमध्ये 'बिग बॉस ओटीटी २'चे विजेते एल्विश यादव आणि सोशल मीडिया स्टार फैजल शेख आपल्या मित्रांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. 

दरम्यान, आता वीकेंड का वारचा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यात एल्विश यादव आणि फैजल शेख अनिल कपूरसमोर एकमेकांना टोमणे मारताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, आजचा एपिसोड चांगलाच धमाकेदार असणार आहे.

अनिलने केले एल्विश आणि फैजलचे स्वागत

'बिग बॉस ओटीटी ३' वीकेंड का वारचा नवा प्रोमो समोर आला आहे. शोमध्ये एल्विश आपला बेस्ट फ्रेंड लवकेश कटारिया, तर फैजल शेख उर्फ मिस्टर फैजू, अदनान शेख यांला सपोर्ट करण्यासाठी आला आहे. एल्विश आणि फैजल यांनी शोमध्ये एन्ट्री करताच स्टेजचं संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. अनिल कपूर यांनी या दोघांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. अनिल एल्विशला विचारतो की, प्रसिद्धी कशामुळे मिळाली. यानंतर तो अनिल फैजलला विचारतो, 'अदनान योग्य खेळ खेळत आहे असं तुला वाटतं का?' यावर फैजल म्हणाला की, तो माझा मित्र आहे त्यामुळे तो १०० टक्के बरोबर खेळत आहे.

अनिल कपूरसमोर एल्विश-फैजलमध्ये शाब्दिक वाद जुंपणार?

फैजलच्या उत्तरावर एल्विश यादव पटकन म्हणतो की, ‘खोटं बोलणं म्हणजे सर तो निरुपयोगी खेळ खेळत आहेत.’ हे ऐकताच फैजल म्हणतो की, ‘सर त्यांने आपलं व्यक्तिमत्त्व दाखवण्यासाठी चार-पाच दिवस घेतले होते.’ फैजलच्या या प्रकरणावर एल्विशचा पारा चढतो. एल्विश म्हणतो, ‘कुठले चार-पाच दिवस आहेत हे मला समजत नाही. मला एक तासही लागला नाही सर…’ या शोचा प्रोमो सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत चाहते सातत्याने प्रतिक्रिया देत आपला उत्साह व्यक्त करत आहेत.

Whats_app_banner