‘बिग बॉस ओटीटी ३’ या वादग्रस्त आणि लोकप्रिय टीव्ही शोला २१ जूनपासून सुरुवात झाली आहे. यावेळी अनिल कपूर शोमध्ये होस्ट म्हणून दिसत आहे. एकीकडे चाहत्यांना सलमान खानची आठवण येत आहे, तर दुसरीकडे अनिलची झक्कस स्टाईलही सगळ्या प्रेक्षकांना आवडत आहे. यावेळी 'बिग बॉस ओटीटी ३'ने टीव्हीपासून बॉलिवूड स्टार्स, पत्रकार, युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरपर्यंत अनेक चर्चित चेहऱ्यांना या शोमध्ये एन्ट्री दिली आहे. ओटीटीवर हा शो सुरू होताच पहिल्या दिवसापासून स्पर्धक एकमेकांना टक्कर देऊ लागले आहेत. अशातच शोमध्ये मारामारीही सुरू झाली आहे. दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी ३’ची स्पर्धक आणि अभिनेत्री सना मकबूल हिने तिचा एक्स बॉयफ्रेंड जर या शोमध्ये सामील झाला, तर काय करेल? यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री सना मकबूल ‘बिग बॉस’सोबतच अनेक टीव्ही शोव्यतिरिक्त ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये झळकली आहे. सध्या सना ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’मध्ये दिसत आहे. सनाने या घरात एन्ट्री करताच आपली स्टाईल दाखवायला सुरुवात केली आहे. सनाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
या शोमध्ये येण्यापूर्वी सनाने नुकताच ‘बॉलिवूड लाईफ’शी संवाद साधला होता. यावेळी जेव्हा सनाला विचारण्यात आले की, 'जर तिचा कुणी एक्स बॉयफ्रेंड या घरात स्पर्धक म्हणून आला तर तिची प्रतिक्रिया काय असेल? यावर सना म्हणाली की, 'या घरात कोण कोण येणार हे मला माहित नाही. माझा असा काही भूतकाळ देखील नाही. त्यामुळे कुणीही आलं तरी मी ठीक आहे. मला काही फरक पडत नाही. असं म्हटलं जातं की, एखाद्याला मागे सोडलं, तर पुन्हा तुम्ही त्याच्याकडे वळून बघायचं नसतं. त्यामुळे माझ्या भूतकाळातून कोणी इथे आले, तर मी त्या व्यक्तीकडे पाहीन. मी म्हणने की 'सॉरी, तू कोण आहेस?'
यावेळी नीरज गोयत, सना मकबूल, साई केतन राव, पौलामी दास, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक, शिवानी कुमारी, सना सुल्ताना, शिवानी कुमारी, दीपक चौरसिया, चंद्रिका दीक्षित, विशाल पांडे, लव कटारिया, मॅक्स एक्सटर्न, रॅपर नेझी या चर्चित चेहऱ्यांनी ‘बिग बॉस ओटीटी ३’ या शोमध्ये एन्ट्री केली आहे. पुन्हा एकदा या शोमध्ये काय पाहायला मिळणार, यासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत.