Bigg Boss OTT 3: पुन्हा एकदा विशाल आणि अरमानमध्ये जुंपली! युट्युबर चिडून म्हणाला, ‘तुझ्यासारख्या लोकांना मी...’
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 3: पुन्हा एकदा विशाल आणि अरमानमध्ये जुंपली! युट्युबर चिडून म्हणाला, ‘तुझ्यासारख्या लोकांना मी...’

Bigg Boss OTT 3: पुन्हा एकदा विशाल आणि अरमानमध्ये जुंपली! युट्युबर चिडून म्हणाला, ‘तुझ्यासारख्या लोकांना मी...’

Published Jul 24, 2024 04:18 PM IST

Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये अरमान मलिकने विशालसोबत झालेल्या भांडणानंतर घरच्यांसमोरच त्याच्या कानाखाली मारली होती. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये जुंपली आहे.

 पुन्हा एकदा विशाल आणि अरमानमध्ये जुंपली! युट्युबर चिडून म्हणाला, ‘तुझ्यासारख्या लोकांना मी...’
 पुन्हा एकदा विशाल आणि अरमानमध्ये जुंपली! युट्युबर चिडून म्हणाला, ‘तुझ्यासारख्या लोकांना मी...’

Bigg Boss OTT 3 Latest Update:बिग बॉस ओटीटी ३’चे स्पर्धक अरमान मलिक आणि विशाल पांडे या शोमध्ये अजिबात एकत्र उठ-बस करताना दिसत नाहीत. कृतिकामुळे या दोघांमध्ये आधीच खूप भांडणं झाली आहेत. आता पुन्हा एकदा दोघांमधील भांडण सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. विशालला थप्पड मारल्यामुळे अरमानला आधीच संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये हाणामारी झाली आहे आणि अरमानने विशालला शिवीगाळ केली आहे.

झॉम्बी टास्कदरम्यान अरमान आणि विशाल यांच्यात भांडण झाले होते. शिवानी आणि कृतिका टास्कमध्ये भांडत होत्या, तोपर्यंत अरमान त्याच्या पत्नीच्या वतीने शिवानीसोबत भांडू लागला होता. तर, विशाल शिवानीच्या बचावात बोलत होता. तेव्हा अरमान आणि विशाल यांच्यात भांडण सुरू झाले. रणवीर शौरीने दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अरमान लिव्हिंग एरियामध्ये कृतिकासोबत बसून भांडणाबद्दल बोलत होता. कृतिका म्हणाली की, त्या लोकांनी अरमानचा अपमान कसा केला की, तो ८वी फेल आहे आणि त्याला इंग्रजीत मेसेजही टाइप करता येत नाहीत.

अरमानला आला राग!

आपल्याबद्दल लोक असं बोलतायत हे ऐकून अरमानच्या रागाचा पारा चांगलाच वाढला. या रागाच्या भरात अरमान म्हणाला की, ‘मी आठवी फेम असलो तरी, यांच्यासारख्या लोकांना नोकर म्हणून कामावर ठेऊ शकतो. काही लोक आपले बुडलेले करिअर पुनर्जीवित करण्यासाठी इथे येत आहेत.’ 

यावेळी अरमानने सगळ्यांची नावे घेतली. तो म्हणाला, सना मकबूलची कारकीर्द बुडाली आहे, विशाललाही कुठेही काम मिळत नाही, तेव्हाच तो इथे आला आहे. इथून थोडी प्रसिद्धी मिळेल, असं त्याला वाटत आहे. लवकेशला तर स्वत:चे काहीच नाव नाही. हे लोक बाहेरच्या जगाचे चमचे आहेत. यादरम्यान अरमानने विशालला खूप शिवीगाळ केला आहे. इतकंच नाही तर, यावेळी त्याने विशालला खूप घालून पाडून बोलण्याचा बिभित्स प्रकार केला आहे.

अरमानला आता सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. अरमानच्या बोलण्यानंतर सगळेच त्यावर टीका करू लागले आहेत. तर, अरमान पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात फिजिकल झाला असून, त्याने दुसऱ्यांदा घराचे नियम मोडले आहेत, अशी कमेंट काहीजण करत आहेत. आता बिग बॉस किंवा अनिल कपूर यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सगळेच करत आहेत.

Whats_app_banner