Bigg Boss OTT 3 Latest Update: 'बिग बॉस ओटीटी ३'ची सुरुवात धमाकेदार झाली आहे. ओटीटीवर या शोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी अनिल कपूर हा शो होस्ट करत आहे. गेल्या वेळेप्रमाणे यंदाही स्टार्सपासून ते पत्रकार, रॅपर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी या शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. स्पर्धक नीरज गोयत या शोमधून पहिल्याच तीन दिवसांत शोमधून बाहेर पडला आहे. आता यानंतर आणखी एक स्पर्धक शोमधून बाहेर पडणार असल्याचे समोर आले आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या पहिल्याच आठवड्यात अनेक स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.
'बिग बॉस ओटीटी ३'बाबत सतत नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. अशातच बिग बॉस शोबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘बिग बॉस ३ ताजा खबर'च्या रिपोर्टनुसार, व्होटिंगचा ट्रेंड समोर आला आहे. घरातील सात स्पर्धकांची नावे नॉमिनेशन लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या यादीत लवकेश कटारिया पहिल्या, पायल मलिक दुसऱ्या, शिवानी कुमारी तिसऱ्या, साई केतन राव चौथ्या, अरमान मलिक पाचव्या, सना सुलताना सहाव्या आणि दीपक चौरसिया सातव्या क्रमांकावर आहेत.
या फोटोत बाणाची खूण शिवानी कुमारीच्या दिशेने आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, निर्माते दीपक चौरसियाला बाहेर काढणार नाहीत. आता शिवानी आणि दीपकमधून कोण बाहेर पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बहुतेक लोकांनी कटारिया आणि साई सुरक्षित असल्याचे म्हटले आहे आणि शिवानी एलिमिनेट झाल्याचे लिहिले आहे.
'बिग बॉस ओटीटी ३'मधून बॉक्सर नीरज गोयत बाहेर पडल्यानंतर आता सना मकबूल, साई केतन राव, पौलामी दास, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक, शिवानी कुमारी, सना सुलताना, दीपक चौरसिया, चंद्रिका दीक्षित, विशाल पांडे, लव कटारिया, मॅक्स एक्सटर्न, रॅपर नेझी या शोमध्ये उरले आहेत.
आता शोमध्ये १५ स्पर्धकांमध्ये स्पर्धा रंगताना आहे. दरम्यान, बिग बॉसने घरच्यांना ‘मॅजिक वेल’ टास्क दिला. या टास्कमध्ये पौलमी दासला चुकून शिवानीमुळे दुखापत झाली होती. शिवानीने जाणूनबुजून धक्काबुक्की केल्याचा आरोप पॉलमीने केला आहे. यानंतर बिग बॉसने शिवानी आणि रणवीर शौरीला एक विचित्र शिक्षा दिली, ज्यादरम्यान शिवानी बेशुद्ध झाली आहे.
संबंधित बातम्या